शेअर इट भाग- ५: शेअर बाजारातील दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी खास टिप्स

>>महेश चव्हाण (अर्थ नियोजन सल्लागार आणि शेअर्स मार्केट तज्ज्ञ)mahesh-chavan-th

कजारिया टाइल्स:-Kajaria Tiles

सध्याची किंमत :- रुपये ७०४

कंपनी बद्दल थोडक्यात माहिती:-

कजरिया टाईल्स ही भारतात सर्वात मोठी तर जगात 9वी टाईल्स बनवणारी कंपनी आहे. ८.४० दशलक्ष चौरस मीटर टाईल्सचे वार्षिक उत्पादन करते. सलग दहावेळा ‘सुपर ब्रॅण्ड’ हा पारितोषिक मिळवणारी एकमेव कंपनी म्हणजे कजरिया टाईल्स.

भविष्यातील अंदाजित किंमत :- रुपये ९५०

बीपीसीएल:- BPCL

सध्याची किंमत :-रुपये ५१४

बीपीसीएल ह्या नावाची ओळख नव्याने करून द्यायची गरज नाही. पेट्रोलचे वाढते दर आपण सगळ्यांच माहीत आहे. बीपीसीएल ही ऑइल आणि गॅस या सेक्टरमध्ये देशातली दुसरी मोठी कंपनी आहे. रिफायनरी, पेट्रोल पंप आणि गॅस अश्या विविध क्षेत्रात मोठं नाव असणारी कंपनी म्हणजे बीपीसीएल.

भविष्यातील अंदाजित किंमत :- रुपये ७५०

सिटी युनियन बँक:-City Union Bank

सध्याची किंमत :- रुपये १७९

सिटी युनियन बँक ही १९०४ ला स्थापन झाली आहे. बँकेचे एकूण शाखा ५५० अधिक आहे. बँकेचा मुख्य उद्देश हा कृषी, रिटेल, एमएसएमई या क्षेत्रांतील लोकांना कर्ज देणे हा आहे. दर वर्षी वीस टक्के प्रमाणाने आपला कारभार वाढवत २०१६-१७ साली १२३५ कोटींचा नफा नोंदवला आहे.

भविष्यातील अंदाजित किंमत :- रुपये २५०

आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. ई-मेल आयडी: [email protected]

टीप- शेअर बाजारात गुंतवणूक हा जोखमीचा विषय आहे. लेखातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाव्यतिरिक्त स्वत: खात्री केल्याशिवाय गुंतवणूक करु नये, गुंतवणुकीत तोटा सहन करावा लागल्यास आम्ही जबाबदार नाही.

आपली प्रतिक्रिया द्या