
>>महेश चव्हाण (अर्थ नियोजन सल्लागार आणि शेअर्स मार्केट तज्ज्ञ)
वोल्टास :- Voltas Limited
सध्याची किंमत :- रुपये ६१९
कंपनी बद्दल थोडक्यात माहिती : गेल्या १०-१५ वर्षात भारतात झालेल्या शहरीकरणामुळे आणि मध्यम वर्गीयाच्या वाढलेल्या उत्पन्नामुळे जीवनशैलीत अमुलाग्र बदल आपल्याला पाहायला मिळाले. याच काळात काही उत्पादने जी फक्त श्रीमंत लोकांच्या गरजा पुरती मर्यादित होती किवा सामान्य व्यक्तीसाठी चैनीची होती, आज ती अत्यंत गरजेची उत्पादने बनली आहेत. त्यापैकी एक म्हणजे वातानुकुलीत यंत्र म्हणजेच Air Condition, यातील जुनी आणि विशासार्हता ठेऊन काम करणारी कंपनी म्हणजे Voltas Limited. जी १९५४ ला Volcart ब्रदर्स आणि टाटा समूहाने मुंबई मध्ये स्थापन केली. भारताच्या विश्वासू कंपन्यांमध्ये ३९ व्या क्रमांकावर असणारी कंपनी Air Conditioner च्या विक्री आणि इतर सेवासाठी पूर्ण भारतभर आपले जाळे पसरवून आहे. वेळोवेळी नवनवीन उत्पादने बाजारात आणणे आणि विक्री वाढविणे यात कंपनीचा हातखंडा आहे. उंचावत जाणारया राहणीमानात Voltas ची हि विक्री वाढत जाईल.दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी एक चांगली संधी
भविष्यातील अंदाजित किंमत :- रुपये ७५०
डीसीबी बँक :-DCB Bank Ltd
सध्याची किंमत :- रुपये १८१
कंपनी बद्दल थोडक्यात माहिती: १९३० साली मुंबई मध्ये इस्माईलिया को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आणि मसालावाला सहकारी बँकेच्या विलीनीकरणा नंतर डेव्हलपमेंट को-ऑपरेटिव्ह बँक झाली .जीजेचे नाव सद्य . डेव्हलपमेंट क्रेडिट बँक असे आहे. डीसीबी बँक लिमिटेड हि व्यक्ती, लहान व मध्यम उद्योग, ग्रामीण बँकिंग आणि मध्य कार्पोरेट्सना उत्पादने ऑफर करते २०१६-१७ या आर्थिक वर्षी बँकेने २१ टक्के नफा नोंदवला आहे.
भविष्यातील अंदाजित किंमत :-रुपये २४५
बर्जर पेंट :- Berger Paints
सध्याची किंमत :- रुपये २५५
कंपनी बद्दल थोडक्यात माहिती:- बर्जर पेंट या कंपनीचे ची नाव आपण प्रत्येकाने ऐकले आहे.सण असो कि लग्न घराला डेकोरेटिव करायची पद्धत आपल्याकडे आहे. भारतात दुसरी सर्वात मोठी होमडेकॉर ची कंपनी म्हणून बर्जर पेंट ची ओळख आहे . अशियन पेन्ट्स नंतर बर्जर पेंट हि भारतातील पेंट क्षेत्रातील एक अग्रगण्य कंपनी आहे.
भविष्यातील अंदाजित किंमत :-रुपये ३२०
आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. ई-मेल आयडी: [email protected]
टीप- शेअर बाजारात गुंतवणूक हा जोखमीचा विषय आहे. लेखातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाव्यतिरिक्त स्वत: खात्री केल्याशिवाय गुंतवणूक करु नये, गुंतवणुकीत तोटा सहन करावा लागल्यास आम्ही जबाबदार नाही.