शेअर इट भाग ९- शेअर बाजारातील गुंतवणुकीसाठी खास टिप्स

148

>>महेश चव्हाण (अर्थ नियोजन सल्लागार आणि शेअर्स मार्केट तज्ज्ञ)mahesh-chavan-th

HDFC Life :- एचडीएफसी लाईफ

सध्याची किंमत :- ४५०.०० रुपये
कंपनीबद्दल थोडक्यात माहिती : एचडीएफसी स्टँडर्ड लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ही हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉपोर्रेशन लिमिटेड, हिंदुस्थानातील एक अग्रणी गृह वित्तव्यवस्था संस्था आणि स्टँडर्ड लाइफ एबरडीन पीएलसी (जगातील सर्वात मोठ्या गुंतवणूक कंपन्यांपैकी एक) यांच्यातील एक संयुक्त उपक्रम आहे. सन २००० मध्ये स्थापित, एचडीएफसी लाईफ हिंदुस्थानातील अग्रगण्य लाइफ इन्शुरन्स म्हणून ओळखली जाते, निवृत्तीवेतन, बचत, उत्पन्न आणि आरोग्य यासारख्या विविध विमा आणि गुंतवणूक उत्पादनांचा समावेश आहे.

पॅन इंडिया एचडीएफसी लाईफचे २०१७ पर्यंत ४१४ पेक्षा जास्त शाखांचा समावेश आहे. लाईफ इन्शुरन्सचे महत्व व हिंदुस्थानातील ग्राहकांची सद्याची संख्या पाहता या कंपनीला व्यवसायवाढीसाठी भरपूर वाव आहे.
भविष्यातील अंदाजित किंमत :- ५४०.०० रुपये

Laures Labs – लॉरस लॅब

सध्याची किंमत :- ५२८.०० रुपये

कंपनीबद्दल थोडक्यात माहिती : लॉरस लॅब हिंदुस्थानातील एक अग्रगण्य फार्मास्युटिकल कंपनी आहे.अँटि-रेट्रोव्हायरल (एआरव्ही) आणि हेपेटाइटिस सीसाठी कंपनीने सक्रिय फार्मास्युटिकल सामग्री (एपीआय) ची अग्रगण्य कंपनी बनण्यासाठी सातत्याने प्रगती केली आहे. लॉरस लॅब ऑन्कोलॉजी आणि इतर उपचारात्मक क्षेत्रामध्ये एपीआयची निर्मिती देखील करतात.

कंपनीकडे ३४ पेटंट्स असून अनेक देशांमध्ये १५२ पेटंट्स अर्ज प्रलंबित आहेत. २०१६ मध्ये रुपये २०१३.६६ दशलक्ष रुपयांच्या गुंतवणुकीसह, लोरस लॅब्स अतिरिक्त एफडीएफ मॅन्युफॅक्चरिंग सुविधा निर्माण केली आहे, यामुळे दर वर्षी १ अब्ज टॅब्लेटची अतिरिक्त क्षमता वाढवून ५ अब्ज गोळ्यांएवढी वाढली आहे शकतात. हळूहळू बदलत जाणारी जीवनशैली, तसेच वातावरण बदलामुळे निर्माण होणारे नवनवीन आजार यांना प्रतिबंध करण्यासाठी अशा फार्मसी कंपन्यांचा खप वाढणारच आहे.

भविष्यातील अंदाजित किंमत :- ६२०.०० रुपये

Blue-star Ltd.- ब्लू स्टार लिमिटेड

सध्याची किंमत :- ७८०.०० रुपये

थंडगार हवा देण्याचे काम गेली कित्येक वर्ष ब्लु स्टार ही कंपनी करत आहे. कंपनी मोट्या प्रमाणात कॉर्पोरेट तसेच निवासी ग्राहकांच्या आवश्यकता पूर्ण करते. हिंदुस्थानातील प्रत्येक तिसऱ्या व्यावसायिक इमारतीत ब्लू स्टार प्रॉडक्ट स्थापित आहे. कंपनीची ४४०० कोटी रुपये एवढी वार्षिक उलाढाल आहे.सध्या हिंदुस्थानातील infrastructre मधील गुंतवणूक, उंचावत जाणारे राहणीमान तसेच सद्याची असलेली गरज हे पाहता ब्लू स्टार प्रॉडक्टची विक्रीही वाढत जाईल, दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी एक चांगली संधी आहे

भविष्यातील अंदाजित किंमत :- ८५०.०० रुपये

आपली प्रतिक्रिया द्या