शेअर इट भाग १४- शेअर बाजारातील गुंतवणुकीसाठी खास टिप्स

158

mahesh-chavan-th>>महेश चव्हाण (अर्थ नियोजन सल्लागार आणि शेअर्स मार्केट तज्ज्ञ)

HDFC Bank Ltd एचडीएफसी (हाउसिंग डेव्हलपमेंट कॉपोर्रेशन कॉर्पोरेशन) बँक

सध्याची किंमत :- २०११ रुपये

एचडीएफसी (हाउसिंग डेव्हलपमेंट कॉपोर्रेशन कॉर्पोरेशन) बँक लि. एक बँकिंग व वित्तीय सेवा देणारी कंपनी आहे, आज साधारण त्यात ८४,३३५ कर्मचारी कार्यरत आहेत आणि बहरीन, हाँगकाँग आणि दुबईमध्ये एचडीएफसी बँक ची उपस्थिती आहे. १९९४ मध्ये एचडीएफसी बँकेची स्थापना करण्यात आली.

एचडीएफसी बँक- हाऊसिंग बँकिंग, रिटेल बँकिंग, ट्रेझरी, दुचाकी-कार कर्ज, वैयक्तिक कर्ज, मालमत्ता आणि क्रेडिट कार्डांवरील कर्ज यासह अनेक उत्पादने व सेवा पुरवते. ही हिंदुस्थानातील सर्वात जास्त मोठी खासगी क्षेत्रातील बँक आहे. हिंदुस्थानातील वाढत जाणारी अर्थव्यवस्था व इतर बाजारपेठेतील गुंतवणूक याचा विचार करता यामधील दीर्घकालीन गुंतवणूक नक्कीच फायदेशीर ठरेल.

भविष्यातील अंदाजित किंमत :-(२ वर्ष) २८५० रुपये

Bharat Forge Ltd -भारत फोर्ज लिमिटेड

सध्याची किंमत :- ७२५रुपये

भारत फोर्ज लिमिटेड (बीएफएल) एक पुणेस्थित हिंदुस्थानी बहुराष्ट्रीय कंपनी आहे ज्यात ऑटोमोटिव्ह, वीज, तेल आणि वायू, बांधकाम आणि खाण,आणि एरोस्पेस उद्योग यांचा समावेश आहे. कंपनीची स्थापना १९६१ रोजी झाली. कंपनीने संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रातील एक मजबूत कामगिरी केली आहे. सध्या भारत फोर्जच्या मुंदवा, सातारा, बारामती, चाकण या चार ठिकाणी निर्मितीकार्य चालते. सातत्याने नवनवीन संशोधन करणे, उत्पादन गुणवत्तेत उत्कृष्ट असणे, अशा व इतर बऱ्याच कारणांनी या कंपनीची घोडदौड वाढतच राहील.

भविष्यातील अंदाजित किंमत : ( २ वर्ष) ९५०रुपये

MGL :- महानगर गॅस लिमिटेड

सध्याची किंमत :- ८७० रुपये

घरातील गॅस सिलेंडर मधील गस संपल्यावर होणारी पला पाल आपण बहुतेक जननी अनुभवली आहे हो ना ? याच अडचणीतून मार्ग काढण्यासाठी किंवा हा प्रश्न सोडवायचे काम गेले २१ वर्ष महानगर गस मुंबई आणि नवी मुंबई मध्ये करत आहे. CNG आणि LPG पुरवणारी एकमेव कंपनी म्हणून हि मगल ची वेगळी ओळख आहे. आतापर्यंत जवळपास ४४०० किलो मीटर च्या पीएप लाईन चे जाळे MGL ने विणले आहे. येत्या ७ वर्ष्यात मुख्य शहरी भागात हे जाळे वाढवण्याच्या दिशेने MGL चे कार्य चालू आहे.

भविष्यातील अंदाजित किंमत(१- २ वर्ष) :- १३००-१४०० रुपये

आपली प्रतिक्रिया द्या