शेअर इट भाग १२- शेअर बाजारातील गुंतवणुकीसाठी खास टिप्स

168
mumbai share market

mahesh-chavan-th>>महेश चव्हाण (अर्थ नियोजन सल्लागार आणि शेअर्स मार्केट तज्ज्ञ)

१) अल्केम लॅबोरेटरीज – Alkem Laboratories Ltd

सध्याची किंमत :- १८३५ रुपये

कंपनीबद्दल थोडक्यात माहिती:- अल्केम लॅबोरेटरीज ही एक बहुराष्ट्रीय फार्मास्युटिकल कंपनी आहे. फार्मास्युटिकल फॉर्मुलेशनची निर्मिती आणि विक्री करणे हा व्यवसाय आहे. याची विक्री आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंदुस्थानात तसेच ५० पेक्षा अधिक देशांमध्ये होते. अल्केममध्ये १६ निर्मिती केंद्र आहेत. त्यात हिंदुस्थानात १४ आणि अमेरिकेत २ आहेत. सध्याची उलाढाल जवळपास रु. ६०० कोटी एवढी आहे.
आरोग्य क्षेत्रात भविष्यातील गरज पाहता या कंपनीची उलाढाल भविष्यात दर वर्षी १५-२० टक्क्याने वाढत राहील.

भविष्यातील अंदाजित किंमत :- १९६० रुपये

२)हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड- Housing Development Finance Corporation Ltd.

सध्याची किंमत :- १८२६.०० रुपये

कंपनीबद्दल थोडक्यात माहिती:- एचडीएफसी हिची १९७७ साली हिंदुस्थानातील पहिली विशेष हाऊसिंग कर्ज पुरवठा करणारी कंपनी म्हणून स्थापना झाली. घर खरेदी / बांधकाम करण्यासाठी कंपनी, व्यक्ती आणि कॉर्पोरेट्सना गृहनिर्माण वित्त ही कंपनी पुरवते. हिंदुस्थानातील गृहकर्जदारांपैकी ही एक सर्वात मोठा कंपनी आहे. तसेच आफ्रिका, ईस्ट युरोपमध्ये देखील ही सेवा पुरवते. संपूर्ण देशभरात ४५३ कार्यालये एचडीएफसी आहेत तसेच दुबई, लंडन आणि सिंगापूरमध्ये ही NRI व इतरांना ही सेवा देण्याचे काम करते. घर ही महत्वाची गरज आहे, स्वतःचे घर असणे हे स्वप्न आपल्या हिंदुस्थानात प्रत्येक जण पाहतो आणि गृहविकासासाठी अजून खूप वाव आहे. पुढे पाहता घरांच्या उगाच वाढत जाणाऱ्या किमतीमध्येही स्थिरता येईल. पण या अश्या कंपन्यांची वाढ हळूहळू होतच राहील.

भविष्यातील अंदाजित किंमत :- १९२५.०० रुपये

३) डॉ. लाल पाथलॅब लि.- Dr Lal Pathlabs Ltd.

सध्याची किंमत :- ८७१ रुपये

कंपनीबद्दल थोडक्यात माहिती:- कै. डॉ. मेजर एस.के. लाल यांनी सन १९४९ मध्ये पॅथॉलॉजी सेवा पुरवण्याचा व्यवसाय म्हणून सुरू केलेली कंपनी आज हिंदुस्थानातील टॉप डायग्नोस्टीक चेन्सपैकी एक आहे. आज जवळपास १७२ क्लिनिकल लॅब, १७५९ पेशंट सर्विस सेंटर व ५०२१ पिक अप पॉइंट आहेत. वर्षभरात आढाव्यामध्ये, एकत्रित उत्पन्नातून कंपनीची २०१६-१७ वार्षिक उलाढाल ९१८५६ लाख
इतकी आहे .

भविष्यातील अंदाजित किंमत :- ९९५ रुपये

आपली प्रतिक्रिया द्या