शेअर इट भाग- २: शेअर बाजारातील दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी खास टिप्स

>>महेश चव्हाण (अर्थ नियोजन सल्लागार आणि शेअर्स मार्केट तज्ज्ञ)mahesh-chavan-th

१) इंटरग्लोब एविशेन :- Indigo

सध्याची किंमत :- रुपये ११७०

कंपनी बद्दल थोडक्यात माहिती :- फक्त श्रीमंतांच्या आवाक्यात असलेले विमान प्रवास सामान्यांची खिशाला परवडणारे बजेट यात मोलाचा वाट उचलणारी कंपनी म्हणजे इंडिगो. भारतात राहणार्या व्यक्तीचे राहणीमान झपाटयाने वादात आहे व्यवसायाच्या रुंदावलेलया कक्षा आणि नौकरीधंद्या मध्ये देशभर पालटलेले उच्चशिक्षत वर्ग यामुळे कधीतरी विमान प्रवासाचा अनुभव घेणारे आज सहलीसाठी किंवा कार्यलयीन भेटीसाठी विमान प्रवास करत आहेत. २००९ पासून २०१७ पर्यंत प्रत्येक वर्षी नफ्यात असणारी कंपनी आणि भारतातील बाजारातील संधी पाहता दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी योग्य कंपनी आहे. ५-१० वर्षसाठी गुंतवणुकीसाठी तुम्ही या कंपनी मध्ये गुंतवणूक करू शकता.

भविष्यातील अंदाजित किंमत (१- २ वर्ष) :रुपये १५००/-

२) हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड :- HPCL

सध्याची किंमत :- रुपये ४१२/-

कंपनी बद्दल थोडक्यात माहिती :- HPCL ही ५०० कंपनीच्या यादीत स्थान असलेली कंपनी .पेट्रोल आणि ऑइल क्षेत्रात मोलाची कामगिरी बजवात आहे भारतीय सरकार चा ५१% वाट या कंपनीत आहे .भारतात झपाटीने वाढणाऱ्या कमाईच्या बळावर तरुणाई दुचाकी आणि चारचाकी चे विक्रमी विक्री होत आहेत .आणि सहाजिकच यात HPCL च्या ग्राहकांची संख्या वाढीस मदत होईल. भारतातील अग्रगण्य कंपनी ONGC या कंपनी ला आपल्या पंखाखाली घेत आहे आणि यासाठी सरकारची मंजुरी हि मिळाली आहे.

भविष्यातील अंदाजित किंमत(१- २ वर्ष) :- रुपये ६००/-

३) फेडरल बँक लिमिटेड :- Federal Bank

सध्याची किंमत :- रुपये ११२/-

कंपनी बद्दल थोडक्यात माहिती :- दक्षिण भारतातील केरळ या राज्यात १९३१ मध्ये सुरुवात होऊन आज संपूर्ण भारत भरात १२५२ शाखा आणि जवळपास १६०७ ATM केंद्रे उभी करून आज खाजगी बँक च्या यादीत आपले एक वेगळे अस्तित्व टिकऊन आहे. श्याम श्रीनिवासन यांच्या नेतृत्वाखाली बँक ने गेल्या वर्षी ४७५ करोड चा नफा कमावला आहे. नव नवीन अत्याधुनिक सेवा ग्राहकांना देणे आणि आपल्या कार्याचा आलेख चढता ठेवण्यात फेडरल बँकेला यश मिळाले आहे.

भविष्यातील अंदाजित किंमत(१- २ वर्ष) :- रुपये १४५/-

आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. ई-मेल आयडी: [email protected]

टीप- शेअर बाजारात गुंतवणूक हा जोखमीचा विषय आहे. लेखातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाव्यतिरिक्त स्वत: खात्री केल्याशिवाय गुंतवणूक करु नये, गुंतवणुकीत तोटा सहन करावा लागल्यास आम्ही जबाबदार नाही.

आपली प्रतिक्रिया द्या