शेअर इट भाग ११- शेअर बाजारातील गुंतवणुकीसाठी खास टिप्स

130
share-market

mahesh-chavan-th>>महेश चव्हाण (अर्थ नियोजन सल्लागार आणि शेअर्स मार्केट तज्ज्ञ)

Sun Pharmaceutical Industries:- सन फार्मास्युटिकल्स

सध्याची किंमत :- ४९५.०० रुपये

सन फार्मास्युटिकल्सची स्थापना १९८३ साली वापी येथे झाली. आज ती भारतातील मानसोपचार तज्ञ, न्यूरोलॉजी, कार्डियोलॉजी, ऑर्थोपेडिक्स, नेत्र विज्ञान, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी आणि नेफ्रोलॉजीची यासाठीची उत्पादन करणारी हि मोठी कंपनी आहे. २०१४ रॅनबॅक्सी कंपनीला या कंपनीने स्वतःहात सामावून घेतले आणि ती भारतातील सर्वात मोठी फार्मा कंपनी बनलि, तसेच अमेरिकेतील सर्वात मोठी भारतीय फार्मा कंपनी आणि जागतिक स्तरावर चौथ्या क्रमांकाची एक्सपेरिटी जेनेरिक कंपनी आहे. ७२% पेक्षा अधिक सन फार्माच्या विक्री भारताबाहेरील मार्केट्समध्ये आहेत, मुख्यतः अमेरिकेत. यूएस हा सर्वात मोठा बाजार आहे, जो सुमारे ५०% व्यवसाय आहे.वातावरण बदल तसेच ऍडव्हान्स मेडिकल सायन्स व इतर कारणांनी औषधाची मागणी वाढतच जाणार आहे.

भविष्यातील अंदाजित किंमत :- ५९०.०० रुपये

TTK Prestige Ltd.:- टिटीके प्रेस्टीज लिमिटेड

सध्याची किंमत :- ६१८५.०० रुपये

टीटीके ग्रुपची स्थापना १९२८ साली एक एजन्सी म्हणून झाली.आपल्या घरी प्रेस्टीज प्रेशर कुकर, नॉन स्टिकी पॅन व इतर वस्तू नक्कीच वापरात असतील. पण या कंपणीची सुरवात श्री टी.एस. कृष्णामाचारी यांनी भारतात विविध फूड, पर्सनल केअर प्रॉडक्ट्स, लेखन साधनांपासून एथिकल उत्पादनांपर्यंत विविध प्रकारच्या उत्पादनांचे वितरण करुन झाली .कॅडबरी, मॅक्सफॅक्टर, किवी, क्राफ्ट, सनलाईट, लाइफबॉय, लक्स, पॉंड्स, ब्रिलक्रिम, केलॉग, ओव्हलटिन, हॉर्क्स, मॅक्लीन, शेफेर, वॉटरमॅन आणि बरेच काही अशा विविध ब्रॅण्डसाठी वितरणाचे काम केले आहे. उत्पादनाची गुणवत्ता आणि त्याची वाढती मागणी या कंपनीसाठी नक्कीच फायदेशीर ठरत राहील.

भविष्यातील अंदाजित किंमत :- ७४५०.०० रुपये

Birla Corporation Ltd. :-

सध्याची किंमत :- ७१४.०० रुपये

पूर्वी बिर्ला ज्यूट मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेड म्हणून ओळखले जाणारी, नांव बदलून आता बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड या नावाने ओळखली जाते. १८९० मध्ये, बिर्ला कॉर्पोरेशन एक ज्यूट मॅन्युफॅक्चरिंग कंपनी होती, कालांतराने यात चार मुख्य विभाग चालविण्याचे काम झाले: सिमेंट, ज्यूट, व्इनोलम, आणि ऑटो ट्रिम. हि कंपनी आदित्य बिर्ला समूहाचा एक भाग आहे, यात धातु, सिमेंट्स, टेक्सटाइल, शेती व्यवसाय, टेलिकम्युनिकेशन, आयटी आणि वित्तीय पुरविल्या जातात येत्या काळात या उत्पादनांची वाढती मागणी या कंपनीसाठी नक्कीच फायदेशीर ठरणारी आहे

भविष्यातील अंदाजित किंमत :- ८२०.०० रुपये

आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. ई-मेल आयडी: [email protected]

टीप- शेअर बाजारात गुंतवणूक हा जोखमीचा विषय आहे. लेखातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाव्यतिरिक्त स्वत: खात्री केल्याशिवाय गुंतवणूक करु नये, गुंतवणुकीत तोटा सहन करावा लागल्यास आम्ही जबाबदार नाही.

 

आपली प्रतिक्रिया द्या