शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स 40651 अंकांवर

share-market

शेअर बाजारात तेजी कायम असून सेन्सेक्सने 40651 अंकांपर्यंत विक्रमी झेप घेतली आहे. निफ्टीचा अंक 51ने वधारून 11999 वर सेन्सेक्स बंद झाला.

मुंबई शेअर बाजार उघडताच सकाळपासूनच सेन्सेक्स वधारला. बाजार बंद होताना सेन्सेक्स 181 अंकांनी वधारून 40651 वर स्थिरावला.

रिलायन्सला आजवरचा सर्वात जास्त दर

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्सच्या दरामध्ये 2.53 टक्क्यांनी वाढ झाली. रिलायन्सचा शेअर्स दर 1548 रुपये होता. आजपर्यंतचा हा सर्वाधिक शेअर दर आहे. या तेजीमुळे रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार भांडवल 990366.80 कोटी रुपयांपर्यंत पोहचले. रिलायन्स इंडस्ट्रीजनंतर टीसीएस आणि एचडीएफसी बँकेचे शेअर्स वधारले. येस बँकेच्या शेअर दरातही 2.65 टक्क्यांनी वाढ झाली.

रुपयाची घसरण सुरूच

एकीकडे शेअर बाजारात तेजी असली तरी दुसरीकडे रुपयाची घसरण मात्र सुरूच आहे. डॉलर्सच्या तुलनेत रुपयाचे मूल्य 10 पैशांनी घसरले. त्यामुळे एका डॉलरसाठी 71.81 रुपये मोजावे लागले.

कुठे तेजी, कुठे घसरण

झी इंटरटेनमेंट, सन फार्मा, इंडसइंड बँक, बीपीसीएल, येस बँक, एल ऍण्ड टी, मारुती, टेक महिंद्रा, पॉवरग्रीड आदी शेअर्समध्ये तेजी संचारली, तर इफ्राटेल, आयओसी, कोटक बँक, आयशर मोटर्स, टाटा स्टील या कंपन्यांच्या शेअर्सला उतरती कळा लागल्याचे दिसून आले.

आपली प्रतिक्रिया द्या