शेअर इट भाग- ६: शेअर बाजारातील दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी खास टिप्स

>>महेश चव्हाण (अर्थ नियोजन सल्लागार आणि शेअर्स मार्केट तज्ज्ञ)mahesh-chavan-th

एशिअन पेंट्स:- Asian Paints

सध्याची किंमत :- ११२५ रुपये

कंपनी बद्दल थोडक्यात माहिती:- एशिअन पेंट्स ही भारतातली पहिली सर्वात मोठी आणि जगातली दहावी कंपनी आहे. ही कंपनी सध्या १६ देशांमध्ये व्यवसाय करत आहे. कंपनी निफ्टी ५०च्या स्टॉकलिस्टमध्ये आहे. काळानुरुप कामाची पद्धत बदलणे हे या कंपनीचे वैशिष्ट्य आहे. वर्षाला २१ टक्के दराने कंपनीचा कारभार वाढत आहे.

भविष्यातील अंदाजित किंमत :- १४५० रुपये

कॅनफिनहोम्स:- Can Fin Homes

सध्याची किंमत :- ४६८ रुपये

कंपनी बद्दल थोडक्यात माहिती:- कॅनफिन होम्स ही कॅनरा बँकेने १९८७ मध्ये स्थापन केलेली कंपनी आहे. घराचं स्वप्न साकारण्यासाठी गृहकर्ज देणे हे या कंपनीचे मुख्य काम आहे. या कंपनीचे जाळे देशभर पसरले आहे. सध्या हिंदुस्थानात कंपनीच्या १३० शाखा आहेत. कंपनी गृहकर्जाव्यतिरिक्त इतर प्रकारची कर्जही पुरवते.

भविष्यातील अंदाजित किंमत :- ५२० रुपये

बजाज फायनान्स:- Bajaj Finance

सध्याची किंमत :- १७०२ रुपये

कंपनी बद्दल थोडक्यात माहिती:- जर आपण एकाद्या इलेक्ट्रॉनिक किंवा मोबाइल दुकानात बजाज फायनान्सची जाहिरात बघितली नाही तर नवलच. बजाज फायनान्स ही बँक नसली तरी तिची कार्यपद्धत ही तशीच आहे. हिंदुस्थानातील ग्राहकांना विविध वस्तूंच्या खरेदीसाठी कंपनी कर्ज पुरवते. या कंपनीची देशात ४५ हजार पेक्षा जास्त केंद्र (सेंटर) आहेत. आपल्या कार्यपद्धतीत नवीन काही तरी करणे ही बजाज फायनान्स ची सवय ग्राहकांना नेहमी आकर्षित करते.

भविष्यातील अंदाजित किंमत :- १९०० रुपये

आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. ई-मेल आयडी: [email protected]

टीप- शेअर बाजारात गुंतवणूक हा जोखमीचा विषय आहे. लेखातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाव्यतिरिक्त स्वत: खात्री केल्याशिवाय गुंतवणूक करु नये, गुंतवणुकीत तोटा सहन करावा लागल्यास आम्ही जबाबदार नाही.

आपली प्रतिक्रिया द्या