आयपीएलमध्ये (IPL 2024) एलिमिनेटर सामन्यात बंगळुरुच्या संघाचा पराभव झाला आणि दिनेश कार्तिकने आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा केली होती. परंतू दिनेश कार्तिकने आता क्रिकेटच्या सर्व फॉरमेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे आपल्या 39 व्या वाढदिवसाचे औचित्य साधत त्याने सोशल मीडियावर एक भाऊक पोस्ट शेअर करत आतापर्यंतच्या क्रिकेट कारकिर्दीच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
टीम इंडियाचा स्टार खेळाडू दिनेश कार्तिकने क्रिकेटच्या सर्व फॉरमेटमधून निवृत्त होत असल्याचे जाहिर केले आहे. त्याने सोशल मिडिया अकाउंट x वर एक भाऊक पोस्ट शेअर करत चाहत्यांना निवृत्ती घेत असल्याची माहिती दिली. तसेच आपल्या दोन दशकांहून अधिक क्रिकेट कारकिर्दीच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
“मागील काही दिवसांपासून मला मिळालेली आपुलकी, पाठिंबा आणि प्रेम पाहून मी भारावून गेलो. त्यामुळे सर्व चाहत्यांचे मी मनापासून आभार मानतो. खूप वेळ विचार केल्यानंतर मी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. माझे खेळण्याचे दिवस मागे ठेवून मी नवीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तयार होत आहे,” अस कार्तिकने आपल्या सोशल मिडिया पोस्टमध्ये म्हटल आहे.
“मी माझे प्रशिक्षक, कर्णधार, निवडकर्ते, संघातील सहकारी आणि सपोर्ट स्टाफमधील सर्व सदस्यांचे आभार मानतो. या सर्वांनी माझा हा दीर्घ प्रवास सुखकर आणि आनंददायी बनवला. ज्यांना देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली अशा काही भाग्यवानांपैकी मी एक आहे,” अशा भावना कार्तिकने व्यक्त केल्या.
“इतक्या वर्षांपासून माझे आई-वडील हे माझे मुख्य आधारस्तंभ आहेत आणि त्यांच्या आशिर्वादाशिवाय मला हे शक्य झाले नसते. मी माझी पत्नी दीपिका हीचाही खूप आभारी आहे, ती स्वत:ही एक व्यावसायिक खेळाडू आहे,” अस म्हणत कार्तिकने आई-वडिल आणि पत्नीप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.
It’s official 💖
Thanks
DK 🙏🏽 pic.twitter.com/NGVnxAJMQ3— DK (@DineshKarthik) June 1, 2024
दिनेश कार्तिकचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण महेंद्र सिंग धोनीच्या आगोदर झाले होते. कार्तिकने 2004 साली टेस्टमध्ये, 5 सप्टेंबर 2004 साली एकदिवसीय क्रिकेटमध्ये आणि 2006 साली टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. दिनेश कार्तिकने टीम इंडियासाठी 26 कसोटी सामन्यांमध्ये 1025 धावा केल्या आहेत. तसेच 94 एकदिवसीय सामन्यांमध्ये कार्तिकने टीम इंडियाचे प्रतिनिधीत्व करताना 1725 धावा केल्या आहेत. तर टी20 मध्ये त्याने 60 सामने खेळले असून 686 धावा केल्या आहेत.