शरजील इमामची अटक म्हणजे इस्लामोफोबिया, जेएनयूतील विद्यार्थी संघटनेचे वादग्रस्त वक्तव्य

599

आसामला हिंदुस्थानपासून वेगळे करण्याचे विखारी वक्तव्य करणारा जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा विद्यार्थी शरजील इमाम याला अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी बिहारमधील जहानाबादमधील त्याच्या मूळ गावातून त्याच्या मुसक्या आवळल्या. शरजीलच्या अटकेवरून जेएनयूतील विद्यार्थी संघटनेने सरकारवर टीका केली असून सरकारला ‘इस्लामोफोबिया’ असल्याचे म्हटले आहे.

‘जेएनयूचा विद्यार्थी शर्जील इमाम याच्यावर देशद्राहाचे गुन्हे दाखल करत त्याला अटक केली आहे. यावरून सरकारचा इस्लामोफोबिया दिसून येतोय. भाजप आणि आरएसएस सत्तेत असलेल्या राज्यात मुस्लींमासोबत दुजाभाव होत आहे. संघ व भाजपला मुस्लिमांवर गुन्हे दाखल करायचे आहेत’, अशी टीका जेएनयूच्या पत्रकातून केली आहे. इंडिया टुडेने याबाबत वृत्त  दिले आहे.

दिल्ली पोलिसांनीही त्याच्याविरोधात कलम 153 अन्वये गुन्हा दाखल केला, तर उत्तर प्रदेशमधील अलीगड येथेही त्याच्याविरोधात गुन्ह्याची नोंद झाली होती. शरजीलच्या अटकेसाठी दिल्ली पोलीस, उत्तर प्रदेश पोलीस आणि बिहार पोलीस एकत्र कामाला लागली होती. यासाठी दोन पथक तयार करण्यात आली होती. अखेर दिल्ली पोलीस आणि बिहार पोलिसांना मंगळवारी त्याला अटक करण्यात यश आले.

आपली प्रतिक्रिया द्या