काँग्रेसचं आपलं काहीही… राष्ट्रपतींसाठी ‘श्री’ वापरलाच नाही

63

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

लोकशाहीमध्ये कोणत्याही पक्षातील नेत्यांना समान सन्मान देणं अपेक्षित आहे. मात्र काँग्रेसमध्ये ‘काहीही’ सुरू आहे. राष्ट्रपतींच्या नावा आधी ‘श्री’ लावण्यावरून तिथं सध्या वाद सुरू आहे. देशाच्या सर्वोच्च पदावर कार्यरत असणाऱ्या प्रणव मुखर्जी यांच्या मदतीला त्यांची लेक शर्मिष्ठा मुखर्जी धावून आली आहे. शर्मिष्ठा यांनी ट्विट करत काँग्रेसला चांगलंच धारेवर धरलं. शर्मिष्ठा यांनी ट्विटवर लिहिलं आहे की, प्रणव मुखर्जी यांच्या नावाआधी ‘श्री’ लावावं कारण ते राष्ट्रपती आहेत. म्हणजेच या देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान आहेत.

 

काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी आणि सध्याचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा जुना फोटो ट्विट करण्यात आला होता. यात फोटोखाली राजीव गांधी यांच्या नावा आधी ‘श्री’ लिहिण्यात आले होते. मात्र प्रणव मुखर्जी यांच्या नावा आधी ‘श्री’ लिहिण्यात आलं नव्हतं. अनेकांना हे खटकलं. सोशल मीडियावरून त्यावरून टीका सुरू झाली. खुद्द शर्मिष्ठा मुखर्जी यांनी काँग्रेसला झापल्यावर काँग्रेसनं आपलं आधीच ट्विट हटवून नव्यानं दोघांच्याही नावा पुढे ‘श्री’ लिहून फोटो ट्विट करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या