अभिनेता शशांक केतकर झाला ‘बाबा’, बाळासोबत फोटो टाकून दिली आनंदाची बातमी

होणार सून मी या घरची या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता शशांक केतकर याच्या घरी एका छोट्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. त्याने बाळासोबत फोटो शेअर करून ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे.

नाताळच्या दिवशी त्याने त्याची पत्नी प्रियांका हिच्यासोबतचा एक फोटो शेअर करून आपण बाबा होणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर त्याच्या बाळाविषयी जाणून घेण्याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांमध्ये होती.

आता शशांकने आपल्या बाळासोबत एक फोटो शेअर केला आहे. शशांक याला मुलगा झाला असून त्याचं नाव ऋग्वेद असं ठेवल्याची माहिती शशांकने दिली आहे.

शशांक सध्या त्याच्या आगामी पाहिले न मी तुला या मालिकेच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. लवकरच तो या मालिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या