एक महिला डॉक्टर बाथरुममध्ये आंघोळ करत होती. तेव्हा हॉस्पिटलचा सफाई कर्मचारी तिचा व्हिडीओ काढत होता. या प्रकरणी पोलिसांनी सफाई कर्मचाऱ्याला अटक केली आहे.
कांदिवलीतल्या शताब्दी हॉस्पिटलमध्ये ही महिला डॉक्टर कार्यरत आहे. याच हॉस्पिटलमध्ये 40 वर्षी जयेश सोलंकी हा सफाई कर्मचारी म्हणून काम कतर होता. गेल्या अनेक दिवसांपासून सोलंकी या महिला डॉक्टरवर नजर ठेवून होता. ही महिला डॉक्टर हॉस्पिटलच्या आवारात असलेल्या कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानात राहत होती.
मंगळवारी सकाळी ही महिला डॉक्टर आंघोळीला गेली. तेव्हा तिला खिडकीतून कुणीतरी व्हिडीओ शूट करताना दिसलं. तेव्हा डॉक्टरने आरडा ओरड केली. आवाज ऐकून आजूबाजूचे लोक धावून आले, त्यांनी सोलंकीला पकडलं आणि पोलिसांच्या हवाली केलं. पोलिसांनी सोलंकीचा फोन जप्त केला. त्या फोन मध्ये महिलेचा आंघोळ करतानाचा चार मिनिटांचा व्हिडीओ सापडला. पोलिसांनी आरोपी सोलंकीला अटक केली असून त्याच्यावर कारवाई सुरू आहे.