मोदी पुन्हा पंतप्रधान बनू नयेत, हीच माझी इच्छा; शॉटगन पुन्हा धडाडली

31

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान बनू नये, हीच माझी इच्छा आहे, असे भाजपचे बिहारमधील खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानाने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. आपण भाजप कधीही सोडणार नाही, पक्षाची इच्छा असेल तर त्यांनी आपल्याला पक्षातून काढावे असा सांकेतीक इशाराही त्यांनी दिला आहे. शत्रुघ्न सिन्हा भाजपवर नाराज असून ते सातत्याने पक्षावर आणि नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत आहेत. त्यामुळे पक्षश्रेष्ठी त्यांच्यावर नाराज असून आगामी निवडणुकीत त्यांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता आहे.

मोदीच पुन्हा पंतप्रधान व्हावेत, मुलायमास्त्राने महाआघाडीची बोलती बंद

सिन्हा यांनी याआधीही मोदी आणि पक्षावर टीका केली आहे. आपण पक्ष सोडणार नाही. पक्षात हिंमत असेल तर त्यांनी आपल्याला पक्षातून काढावे असा इशारा त्यांनी याआधीही दिला आहे. पश्चिम बंगालमध्ये झालेल्या महाआघाडीच्या मंचावरही ते दिसले होते. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यासोबतही ते दिसले होते. तसेच ते सातत्याने पक्षावर टीका करत असल्याने त्यांना आगामी निवडणुकीत तिकीट मिळणार नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्यांनी आता पक्षावर आणि मोदीवर कडाडून हल्ला चढवला आहे. समाजवादी पक्षाचे आधारस्तंभ मुलायमसिंह यादव यांनी मोदी यांना पुन्हा पंतप्रधानपदासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. मोदी यांना पुन्हा पंतप्रधान झालेले पाहायला आवडेल असे ते म्हणाले होते. त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर सिन्हा यांनी मोदींवर हल्ला चढवला आहे. मोदी यांनी पुन्हा पंतप्रधान बनू नयेत, ही आपली इच्छा असल्याचे ते म्हणाले. मुलायमसिंह यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वतावरण तापले आहे. राहुल गांधी यांनी मुलायमसिंह यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. तर 2014 मध्ये मुलायमसिंह यांनी मनमोहन सिंग यानांही अशाच शुभेच्छा दिल्या होत्या, असे राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे म्हणाल्या.

आपली प्रतिक्रिया द्या