Video: हिंदुस्थानविरोधी घोषणा देणाऱ्या पाकिस्तानी आंदोलनकर्त्यांना भिडल्या शाझिया इल्मी

1624

दक्षिण कोरियातील सेऊल शहरात हिंदुस्थानविरोधी व पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात घोषणा देणाऱ्या पाकिस्तानी आंदोलनकर्त्यांसोबत भाजपच्या नेत्या शाजिया इल्मी यांचा वाद झाला. त्यानंतर इल्मी यांनी निर्भिडपणे शेकडो पाकिस्तानी आंदोलनकर्त्यांसमोर हिंदुस्थान झिंदाबादचे नारे दिेले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी त्यांच्या देशभक्तीचे कौतुक केले आहे.


शाजिया इल्मी या सेऊलमध्ये आयोजित युनायटेड पीस फेडरेशन कॉन्फेरन्समध्ये सहभाग घेण्यासाठी गेल्या होत्या.  शनिवारी शाजिया सेऊलमधील हिंदुस्थानी दूतावासात जात होत्या. त्यावेळी तेथे बाहेर काही आंदोलक हिंदुस्थान व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणा देत होते. सुरुवातीला शाजिया यांनी त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला. मात्र आंदोलकांच्या घोषणा थांबत नसल्याचे पाहून त्यांनी स्वत: हिंदुस्थान झिंदाबादचे नारे दिले. त्यांनंतर पोलिसांनी मध्यस्थी करत शाजिया यांनी दूतावासात जाण्यास सांगितले.

‘आंदोलनकर्ते पाकिस्तानचे झेंडे घेऊन हिंदुस्थान व पंतप्रधानांविरोधात घोषणा देत होते. त्यामुळे आम्ही त्यांच्याशी चर्चा करायला गेलो. मात्र ते कलम 370 हटविल्यावरून वाद घालत होते व हिंदुस्थानविरोधी नारे देत होते’, असे इल्मी यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या