इंग्लंडमध्ये मेंढय़ांची मॅरेथॉन

12

सामना ऑनलाईन । लंडन

एरव्ही मोकळय़ा रानात चरणाऱया मेंढय़ा जेव्हा भल्यामोठय़ा कळपाने रस्त्यावर येतात तेव्हा काय होईल याचा अंदाज तुम्ही केला आहे का? इंग्लंडमध्ये तब्बल ८०० मेंढय़ांचा कळप रस्त्यावर आल्याने ट्रफिक जॅमची समस्या निर्माण झाली. येथील नॉर्थ यॉर्कशायरमध्ये नुकतीच ही मेंढय़ांची मॅरेथॉन स्पर्धा बघायला मिळाली. हा कळप आपल्या घरी जात होता. दर वेळेस मोकळय़ा मैदानाच्या मार्गातून या मेंढय़ा घरचा रस्ता धरतात, पण त्या दिवशी अचानक या मेंढय़ांनी रस्त्याचा ताबा घेतला. त्यामुळे रस्त्यावरील गाडय़ांना जागचे हलताही येत नव्हते.

आपली प्रतिक्रिया द्या