शेफाली शाह पुन्हा दिग्दर्शनात!

भूमिकेबाबत चोखंदळ असलेली अभिनेत्री शेफाली शाह हिने ‘सम डे’ या लघुपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले होते. या लघुपटाचे सर्वत्र कौतुक झाले. आता पुन्हा एकदा शेफाली ‘हॅपी बर्थडे मम्मीजी’ या लघुपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. रॉयल स्टॅग बॅरेल सिलेक्ट लार्ज शॉर्ट फिल्म्स प्रस्तुत आणि सनशाईन पिक्चर्स निर्मित या लघुपटाचे लेखन-दिग्दर्शन शेफालीनेच केले आहे.

यात एका महिलेचा भावनात्मक प्रवास आहे. ज्याच्यासोबत प्रत्येक महिला स्वतःला जोडून घेऊ शकते, असे शेफाली म्हणाली. पुढे ती म्हणाली, ही आपल्या सर्वांचीच गोष्ट आहे. सर्वच जबाबदाऱयांतून मुक्त व्हावे असे कधी ना कधी आपल्याला वाटते. लॉकडाऊनमुळे आमच्या मनात विलगतेची तीव्र भावना बिंबवली, परंतु त्यास वेगळ्या पद्धतीने घेतलं तर काय… एखाद्या वेळी आपल्या प्रिय व्यक्तींपासून किंवा आपण निर्माण केलेल्या नात्यांपासून आपल्याला खरोखरच अंतर आवश्यक असेल तर काय… अशी लघुपटाची कथा आहे. लघुपट www.thelargeshortfilms.com  या संकेत स्थळावर प्रदर्शित झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या