शेगावकरांचे आरोग्य धोक्यात; भटक्या कुत्र्यांमध्ये कर्करोग, चर्मरोग

बुलढाणा जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र असलेल्या शेगावमध्ये हजारो भटक्या कुत्र्यांमध्ये कर्करोग आणि चर्मरोगाची लक्षणे असल्याचे समोर आले आहे. यामुळे शेगावकरांचे आरोग्य धोक्यात आले असून लवकरच नगर परिषदेच्या वतीने भटक्या कुत्र्यांची निर्बिजिकरणाची मोहीम राबविण्यात येणार आहे.

शेगावात कुत्र्यांच्या त्रासाला कंटाळून नागरिकांनी अनेकदा तक्रारी केल्यानंतर आता नगर परिषदेला जाग आली असून लवकरच या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात येणार आहे. अनेक ठिकाणी नागरिकांवर भटक्या कुत्र्यांनी जीवघेणे हल्ले केले असून देऊळघाट व रायपूर येथे लहान मुलांवरही या कुत्र्यांनी हल्ले केल्याचे समोर आले आहे. कुत्र्यांच्या निर्बिजीकरणासाठी कोल्हापूर येथून सेप ग्रुपला पाचारण करण्यात आले आहे. आतापर्यंत पकडलेल्या कुत्र्यांपैकी जवळपास 271 कुत्र्यांना कर्करोग झाल्याचे समोर आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या