आधी तपास सुरू करा, मग पुरावे देते – शेहला रशीद

1219

जम्मू-कश्मीरमधून 370 कलम हटवल्यानंतर हिंदुस्थानी लष्कर कश्मिरींचा छळ करत असल्याचा आरोप करत ट्विट करणारी जेएनयूची माजी विद्यार्थी नेता शेहला रशीद हिने आधी मी केलेल्या आरोपांचा आधी तपास सुरू करा, मग त्याचे पुरावे देते, असे घुमजाव करत पत्रकारांच्या प्रश्नांना बगल दिली.

तुम्ही जे आरोप केले त्याचे तुमच्याकडे काही पुरावे आहेत का, असा प्रश्न केल्यावर लष्कराने माझ्याविरोधात तपास सुरू केल्यावर मी त्यांना पुरावेही देईन. पण लष्कराने माझ्याविरोधात तपास सुरू केला आहे का, माझ्याविरोधात तपास होणार आहे का, असे प्रश्न विचारत तिने पळ काढला. दिल्लीतल्या जंतरमंतरमध्ये आज सर्व पक्षीय निर्देशनात भाग घेण्यासाठी ती श्रीनगरहून दिल्लीला आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या