शेखर कपूर करणार ‘ब्रुस ली’वर चित्रपटनिर्मिती

सामना ऑनलाईन, मुंबई

बॉलीवूडमध्ये सध्या बायोपिक चित्रपटांची लाट आहे. ‘मासूम’ आणि ‘मि. इंडिया’सारख्या दर्जेदार चित्रपटांचे दिग्दर्शक शेखर कपूरदेखील आगामी काळात ऍक्शन हीरो ब्रुस लीच्या जीवनावर आधारित ‘लिटल ड्रगन’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

या चित्रपटात ब्रुस लीच्या लहानपणापासून ते तारुण्यापर्यंतचा प्रवास उलगडून दाखवण्यात येणार आहे. ब्रुस लीच्या व्यक्तिरेखेसाठी अद्याप कोणत्याही कलाकाराची निवड करण्यात आलेली नाही. ब्रुस लीची मुलगी शेनन ली सध्या या चित्रपटाच्या पटकथेवर काम करत आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या