अभिनेत्रीला गुप्तांग काढून दाखवले, साजिद खानवर पुन्हा एकदा गंभीर आरोप

अभिनेता साजिद खान हा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. दिवंगत अभिनेत्री जिया खानच्या बहिणीने त्याच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर आता कामासूत्रा फेम अभिनेत्री शर्लीन चोप्राने देखील त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे.

sharlin-chopra-12

‘2005 साली एका मिटींगसाठी मी साजिद खानला भेटायला गेले होते. त्यावेळी त्याने त्याच्या पँटमधून गुप्तांग बाहेर काढले. त्यानंतर त्याने मला गुप्तांग हातात पकडून कसं वाटतं ते सांगायला सांगितले. तेव्हा मी त्याला सांगितले होते की मला माहित आहे की ते हातात घेतले की कसं वाटत. मी इथे कामासाठी आले आहे. हे सर्व करायला नाही’, असे ट्विट शर्लीनने केले आहे.

त्यानंतर आणखी एक ट्विट करत तिने आपल्याकडे याबाबतचे पुरावे असल्याचा दावा देखील केला आहे. ‘मी जे काही बोलले ते आरोप नाही तर ते सत्य आहे. आमचे फोन रेकॉर्ड जरी तपासले तरी त्यातून या गोष्टी समोर येतील.’, असा दावा शर्लीनने केला आहे.

जिया खानच्या बहिणीचा गंभीर आरोप

गेल्या आठवड्यात बीबीसीवर जिया खानवर आधारित ‘डेथ इन बॉलिवूड’ हा टीव्ही शो प्रसिद्ध करण्यात आला. हा कार्यक्रम फक्त युकेमध्ये दाखवण्यात आला होता. या शोच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये जिया खान हिची बहिण करिश्मा हिने साजिदवर बहिणीचा लैंगिक छळ केल्याचा आरोप केला.

हाऊसफुल्लच्या सेटवर घडलेला हा भयंकर प्रकार

हा किस्सा ‘हाऊसफुल्ल’ चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यानचा आहे. चित्रिकरणासाठी रिहर्सल सुरू होती आणि जिया स्क्रिप्ट वाचत होती. त्याच वेळी साजिदने तिला टॉप आणि ब्रा काढण्यास सांगितले. साजिदच्या या विधानामुळे तिला धक्का बसला पण ती शांत बसली. याबाबत तिनेच आपल्याला सांगितले होते, असेही करिश्मा म्हणते. चित्रपटाचे चित्रिकरण अद्याप सुरुही झाले नव्हते आणि हे असे सर्व होत होते. त्यामुळे ती फार अस्वस्थ होती. ती घरी आली आणि रडत बसली होती, असेही तिने सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या