शेर्पाने एव्हरेस्ट 23 वेळा सर करून केला विश्वविक्रम

सामना ऑनलाईन । काठमांडू

नेपाळमधील शेर्पा कामी रिता (49) यांनी बुधवारी सकाळी जगातील सर्वात उंच शिखर एव्हरेस्ट 23 वेळा सर करून जागतिक विक्रमाची नोंद केली. या आधीचा सर्वाधिक वेळा एव्हरेस्ट सर करण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर होता. सुलुकुंभू जिल्ह्यातील थेम गावात कामी राहतात. त्यांनी बुधवारी आपल्या इतर सहकाऱ्यांसह हे शिखर सर केले.

1994पासून त्यांनी शिखर सर करायला सुरुवात केली. 1995चा अपवाद सोडता त्यांनी आतापर्यंत हे शिखर यशस्वीपणे सर केले.