फरहान-शिबानीचे गुटरगू, बिकीनीमधील फोटो व्हायरल

74

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

बॉलिवूडमध्ये आपल्या वैविध्यपूर्ण भूमिकाची छाप पाडणारा अभिनेता, दिग्दर्शक फरहान अख्तर आणि अभिनेत्री शिबानी दांडेकर यांच्यात गुटरगू सुरू आहे. गेल्या वर्षभरापासून ते एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा बी टाऊनमध्ये आहेत. नुकताच शिबानीचा एक बिकीनीमधील फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोचे क्रेडीट मात्र फरहान अख्तरला मिळाले आहे.

सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या शिबानीचा बिकीनीतील फोटो फरहान अख्तरने काढलेला आहे. शिबानीने इन्स्टाग्रामवर हा फोटो अपलोड केला असून अभिनेत्री पुजा हेगडे, रिया चक्रवर्ती, मिनिषा लांबा यांनी त्याला लाईक केले आहे. नेटिझन्सने तिच्या फिटनेसची प्रशंसा केली आहे. विशेष म्हणजे दोघांचे एकत्रित फोटोही व्हायरल झाले आहेत.


View this post on Instagram

#beachbum #thatbrowngirl body by @drewnealpt #bodybydrewneal photo by @faroutakhtar outfit by @hm #nofilter Monday’s!

A post shared by Shibani Dandekar (@shibanidandekar) on

दरम्यान, फरहानसोबत रिलेशनशिपबाबत एका मुलाखतीमध्ये बोलताना शिबानीला प्रश्न विचारण्यात आला. लोकांच्या नजरा तुमच्यावर खिळल्या असल्याने तुमच्या खासगी जीवनावर याचा प्रभाव पडला का? याला उत्तर देताना शिबानी म्हणते, मला असे वाटते की ते प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून आहे की तुम्ही लोकांना कशा प्रकारे हाताळता. काही लोकांवर प्रभावही पडतो आणि काही याकडे दुर्लक्ष करतात.


View this post on Instagram

Sunshine and smiles. @shibanidandekar ❤️

A post shared by Farhan Akhtar (@faroutakhtar) on

आपली प्रतिक्रिया द्या