महिला गुरुजी

>>शिबानी जोशी<<

बाप्पाच्या पूजेसाठी गुरुजी न मिळणं ही गेल्या काही वर्षांतील सर्रास गोष्ट. मग आता त्याला सीडी, ऍप्स यांचे ऑनलाईन पर्यायही उभे राहिले आहेत. ही सगळी आधुनिकता असली तरी प्रत्यक्ष गुरुजींनी येऊन यथासांग पूजा सांगणं हा आनंद काही वेगळाच असतो. सध्या पुरुष पुरोहितांचा हा तुटवडा भरून काढण्यासाठी महिला पुरोहित पुढे सरसावल्या आहेत. मुंबई, ठाणे, पुणे येथे या महिला गुरुजी पूजा सांगायला घरी जातात. स्पष्ट शब्दोच्चार, पूजेतील प्रत्येक विधी सोपा करून समजून देण्याची हातोटी आणि सहकार्याची वृत्ती त्यामुळे या गुरुजी On Demand आहेत.

mandakini-leleपुण्यातल्या मंदाकिनी लेले गेली 25-30 वर्षे त्या पौरोहित्य करत आहेत व महिलांना पौरोहित्य शिकवतही आहेत. आतापर्यंत त्यांनी 325हून अधिक महिलांना पौरोहित्य शिकवले आहे. आपण पूजा का करतो, तिचं महत्त्व काय, पूजेतही आपण एखादी विधी का करत आहोत याची नीट माहिती त्या यजमानांना देतात. त्यांच्याकडे येणाऱ्या महिलांना याग, एकादषी पवमान, लघुरुद्र, महारुद्र, वरदशंकर असे अनेक पूजाविधी त्या शिकवतात व पूर्ण पाठांतर करून घेतात. सुपारीची पूजा का करायची, कलशाची का करायची, याचं ज्ञानही त्या देतात. बऱ्याच वेळा यजमान पूजा गुंडाळली जाते म्हणून नाराज असतात. त्यामुळे एखादा माणूस घरी पूजा करतो, गणपती आणतो तेव्हा त्यामागे त्याची श्रद्धा, पैसा, वेळ, समाधान सर्वच जोडले गेलेले असते. त्यामुळे आम्ही महिला साग्रसंगीत पूजाविधी करतो. खरं तर महिलांना स्वतःच्या घरीसुद्धा सर्व यथासांग करण्याची सवय असते. त्यामुळे महिला पुरोहितही शॉर्टकट मारत नाहीत.त्यांना संपर्क साधायचा असल्यास 9422477305 या क्रमांकावर संपर्क साधावा.

aasha-sidhye आशा शिधये या मंदाकिनी लेले यांच्याकडेच 10-12 वर्षे शिकत होत्या. त्यांच्याकडेही पहिल्यापासून धार्मिक वातावरण होतं. त्यांचे वडील रामदास स्वामींचे निस्सीम भक्त होते. त्यामुळे रामजन्म वगैरे घरी मोठय़ा प्रमाणात होत असे. आवड होतीच, निवृत्त झाल्यावर सवडही होती. स्पष्ट शब्दोच्चार व पाठांतर चांगले होते. त्यामुळे लेलेबाईंकडे शिकत शिकत आशाताईसुद्धा गेली काही वर्षे पुण्यात पूजा सांगतात. त्यामुळे आशा शिधये यांच्याशी संपर्क साधायचा असल्यास 9881583798 या क्रमांकावर संपर्क साधावा.

aarati-ranade मुंबईतही आरती रानडे यासुद्धा गेली 15-20 वर्षे पूजा सांगत आहेत. पुष्पा शेणोलीकर यांच्याकडे त्या आधी शिकल्या. तसंही त्यांचे सासरे, पतीसुद्धा पौरोहित्य करतात. त्यामुळे घरात वातावरण होतंच. त्यामुळे जाणीवपूर्वक पौरोहित्याचे वर्ग लावून त्यांनी शिक्षण घेतले आणि प्रथम लहान लहान पूजा, नंतर सत्यनारायण, मंगळागौर, गंगापूजन, वटसावित्री, रुद्र, साखरपुडासुद्धा केला असं त्या सांगतात. हे काम करताना स्वतःलाही समाधान मिळतं.. अर्थार्जन होऊन आपण सक्षम झाल्यानंही आत्मविश्वास दुणावतो असे या महिलांचे म्हणणे आहे. त्यांना संपर्क साधायचा असल्यास 8097660038 5 या क्रमांकावर संपर्क साधावा.

surekha-patwardhan वांद्रे इथे राहणाऱ्या सुरेखा पटवर्धन यासुद्धा गेली 23 वर्षे पौरोहित्य करत आहेत. त्यांनी संस्कृत विषय घेऊन ग्रॅज्युएशन केले होते. घरी धार्मिक, आध्यात्मिक वातावरण होते. वडील सर्व पूजा करायचे. एकदा घरी सत्यनारायणाची पूजा ठेवली होती व अचानक गुरुजी आले नाहीत. सर्व तयारी झाली होती. मग अशावेळी काय करायचं, तर नुसती साधी पूजा करून नैवेद्य दाखवून आम्ही तो दिवस साजरा केला, पण त्यावेळी म्हटलं की, अशी वाट पाहण्यापेक्षा आपल्याला पूजा येत असती तर किती बरं झालं असतं! म्हणून सुरेखाताईंनी पूजा शिकायला सुरुवात केली. अगदी गुरुजींनी नीट शिक्षण दिलं आणि पहिली सत्यनारायण पूजा सांगितली. आत्मविश्वास निर्माण झाल्यावर सत्यविनायक, गणपती, सप्तशती, उदकशांत, साखरपुडा अशी पूजाविधीही सांगायला सुरुवात केली. परंतु पूजा सांगून झाल्यावर यजमानाप्रमाणे स्वतःतही एक प्रकारची ऊर्जा निर्माण होते. मन शांत, शुद्ध होते असे त्या मानतात. आपण कोणाकडेही इतकी दक्षिणा द्या असे सांगत नाही. जी देतील ती घेते असेही त्या सांगतात. लंडनला गेलो असताना तिथेही त्यांनी पूजा सांगितली आणि त्यांना इतकी आवडली की, पुन्हा लंडनचं आमंत्रण मिळालं आहे. यांच्याशी संपर्क साधायचा असल्यास 965256821 या क्रमांकावर संपर्क साधावा.