एवढी मस्ती असेल तर हा प्रकल्प पुढे रेटून दाखवाच!

20

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी 

‘तुमच्या डोक्यात मस्तीची भांग इतकी चढली असेल तर हा प्रकल्प पुढे रेटून दाखवाच!’ असे आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले. मुख्यमंत्र्यांच्या विधानावर त्यांची ही उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती.

भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याचे मत हे सुभाष देसाईंचे वैयक्तिक असल्याच्या मुख्यमंत्र्यांच्या विधानाची उद्धव ठाकरे यांनी खिल्ली उडवली. ‘‘सुभाष देसाई हे कॅबिनेट मंत्री आहेत. भूसंपादन अधिसूचना रद्द करण्याचा निर्णय त्यांनी संबंधित खात्याचे मंत्री म्हणून घेतला आहे. हे त्यांचे वैयक्तिक मत असू शकत नाही!’’

मुख्यमंत्र्यांनी कोकणवासीयांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, असे सांगून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचा मुखवटा फाडला. धर्मेंद्र प्रधान या केंद्रीय मंत्र्याने रिफायनरीच्या अरबी मालकांबरोबर ‘एमओयू’ करताच मुख्यमंत्र्यांनी सांगितले ‘हा प्रकल्प नाणारला येणारी रिफायनरी नाही!’ पण ते खोटे बोलले असे आता स्पष्ट झाले आहे. जर धर्मेंद्र प्रधान यांनी वेगळय़ाच कंपनीशी करार केला असेल तर मुख्यमंत्री नाणार प्रकल्प रद्द झाल्याची घोषणा का करीत नाहीत. भाजपचे आमदार आशीष देशमुख यांनी हा प्रकल्प विदर्भात नेण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी ती मान्य करायला हवी.

आपली प्रतिक्रिया द्या