‘गब्बर’ला पुन्हा दुखापत, न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का

723

न्यूझीलंड दौरा सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला असून सलामीवीर शिखर धवन टी-20 मालिकेला मुकणार आहे. हिंदुस्थानचा संघ न्यूझीलंड दौऱ्यात पाच टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. परंतु दुखापतीमुळे धवन या मालिकेतून बाहेर फेकला गेला आहे.

टीम इंडियाचा संघ न्यूझीलंड दौऱ्यासाठी रवाना, पाहा संपूर्ण वेळापत्रक

ऑस्ट्रेलियाविरुद्ध बंगळुरुत झालेल्या अखेरच्या लढतीत शिखर धवनला दुखापत झाली होती. त्या निर्णायक लढतीतही शिखर सलामीला फलंदाजीसाठी उतरला नव्हता. त्यानंतर त्याला फलंदाजीचा संधी मिळाली नाही. मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका संपल्यानंतर टीम इंडियाचा संघ न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना झाला त्या खेळाडूंसोबत शिखर दिसला नाही. त्याचवेळी धवनच्या न्यूझीलंड दौऱ्याबाबत सस्पेंस निर्माण झाला होता. अखेर मंगळवारी दुपारी तो टी-20 मालिकेतून बाहेर पडल्याचे स्पष्ट झाले. धवनच्या जागी अद्याप दुसऱ्या खेळाडूच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाही.

बंगळुरुत झाली दुखापत
बंगळुरुत झालेल्या निर्णायक लढतीत ऑस्ट्रेलियाच्या डावादरम्यान पाचव्या षटकात शिखरला दुखापत झाली होती. कव्हरला क्षेत्ररक्षण करताना फिंचने मारलेला चेंडू रोखण्यासाठी धवनने सूर मारला, मात्र यावेळी तो खांद्यावर आदळला. त्यावेळी वैद्यकीय पथकाने मैदानात धाव घेतली आणि उपचार केले. मात्र दुखापत गंभीर असल्याने तो मैदानाबाहेर गेला आणि त्यानंतर पुन्हा मैदानात उतरला नाही.

dhavan2

दुखापतीचे ग्रहण कायम
धवन गेल्यावर्षी दोनदा दुखापतग्रस्त झाल्याने संघातून बाहेर फेकला गेला होता. इंग्लंडमध्ये झआलेल्या वर्ल्डकपदरम्यान ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत नाथन कुल्टर नाईलचा चेंडू लागल्याने धवनच्या अंगठ्याला दुखापत झआली होती. त्यामुळे तो संपूर्ण स्पर्धेला मुकला होता. दुखापतीतून पुनरागमन केल्यानंतर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी दरम्यान त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. त्याची शस्त्रक्रीयाही करण्यात आली होती. त्यामुळे तो वेस्टइंडीजविरुद्धची एक दिवसीय आणि टी-20 मालिकेला मुकला होता.

dhavan

इंशांत शर्मालाही दुखापत
धवनपाठोपाठ वेगवान गोलंदाज इशांत शर्मा याच्या पायाच्या घोट्याला (ankle tear) दुखापत झाल्याने तो न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता आहे. हा टीम इंडियाला मोठा धक्का असणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या