IPL मध्ये सलग 4 अर्धशतक ठोकणारे 3 हिंदुस्थानी खेळाडू, जाणून घ्या

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेत खेळाडूंवर कोट्यवधी रुपयांची बोली लागते. काही फलंदाज आणि गोलंदाज आपल्या कामगिरीची छाप उमटवतात. क्रिकेटच्या या छोट्या स्वरूपात वेगाने धावा काढणे महत्वाचे असते. तसेच फलंदाजांना सातत्य टिकवून ठेवणेही आवश्यक असते. तरच संघातील स्थान पक्के होते. आयपीएलमध्ये अनेक फलंदाजांनी जबरदस्त खेळ केला आहे. आज आपण आयपीएलमध्ये सलग 4 लढतीत अर्धशतक ठोकणाऱ्या 3 हिंदुस्थानी खेळाडूबाबत जाणून घेऊया…

1. शिखर धवन (2020)

screenshot_2020-10-20-21-39-42-187_com-android-chrome
दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर खेळाडू शिखर धवन (shikhar dhawan) याने आयपीएल 2020 मध्ये अशा कामगिरीची नोंद केली आहे. जबरदस्त फॉर्मात असणारा धवन दिल्लीच्या फलंदाजीचा कणा आहे. धवनने यंदा 2 शतक ठोकले असून सलग 4 लढतीत 50 हुन अधिक धावा चोपल्या आहेत. गेल्या 4 लढतीत धवनच्या बॅटमधून नाबाद 67, 57, नाबाद 101 आणि नाबाद 106 अशा धावा बरसल्या आहेत.

2. विराट कोहली (2016)

images-7
आयपीएलमध्ये आरसीबीचा कर्णधार विराट कोहली (virat kohli) साठी 2016 हे वर्ष अविस्मरणीय असेच ठरले. विराटने 4 शतकांसह 973 धावा चोपल्या होत्या. तसेच सलग 4 लढतीत अर्धशतक ठोकत वीरेंद्र सेहवाग नंतर अशी कामगिरी करणारा दुसरा हिंदुस्थानी खेळाडू ठरला.

3. वीरेंद्र सेहवाग (2012)

images-8
टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हील्स (आता दिल्ली कॅपिटल्स) संघाचे प्रतिनिधित्व केलेल्या वीरेंद्र सेहवागने (virender sehwag) सर्वात आधी अशी कामगिरी नोंदवली. आयपीएल 2012 मध्ये सेहवागने नाबाद 87, 73, 63 आणि 73 अशी खेळी करत सलग 4 लढतीत अर्धशतक ठोकले होते.

आपली प्रतिक्रिया द्या