राज कुंद्रावर विचित्र मास्क घालण्याची पाळी, पाहा व्हिडीओ

पॉर्न चित्रपटांची निर्मिती केल्याप्रकरणी तुरुंगाची हवा खाऊन आलेल्या राज कुंद्रा याला आजही समाजात उजळ माथ्याने फिरण्याचे धाडस होत नाहीये. राज कुंद्रा हा आजही तोंड लपवत फिरत असतो. लोकांना आपण कोण आहे हे कळू नये किंवा आपला चेहरा लोकांना दिसू नये यासाठी त्याने एक विचित्र मास्क घालायला सुरुवात केली आहे. हा मास्क पाहिल्यानंतर त्याला लोकांनी ‘वेल्डींगवाला भैय्या’ म्हणत चिडवायला सुरुवात केली आहे. काहींनी म्हटलंय की, कारनामेच असेल केलेत ज्यामुळे तोंड लवपत फिरावं लागतंय.

राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. यामध्ये राज कुंद्रा एक विचित्र मास्क घालून फिरताना दिसतोय. हॉटेलमधून शिल्पा आणि राज कुंद्रा बाहेर पडताच त्यांना फोटोग्राफरनी घेरलं होतं. फोटोग्राफरनी राज कुंद्रा याला मास्क काढण्याची विनंती केली मात्र त्याने ती शेवटपर्यंत ऐकली नाही. काळी पँट, काळा शर्ट, काळं जॅकेट घातलेल्या राज कुंद्रा याच्या मास्कचा रंगही काळाच होता.

दुसरीकडे शिल्पा शेट्टी निळ्या रंगाच्या छान अशा वन पीसमध्ये फोटोग्राफरना मनमोकळेपणाने फोटो देत होती. फोटोग्राफरनी शिल्पा शेट्टी हिला मराठीत म्हटलं की एक सरांसोबतही फोटो द्या, त्यावर शिल्पा त्यांना म्हणाली की ‘सर गेले’. या फोटोवर सोशल मीडियातून तऱ्हेतऱ्हेच्या प्रतिक्रिया येताना बघायला मिळतायत. एकाने म्हटलंय की ‘तोंड काळं कसं करायचं ते यांच्याकडून शिकावं’ तर दुसऱ्या एका युजरने म्हटलंय की ‘आता काय आयुष्यभर तोंड लपवत फिरणार आहे का ?’