नवरा काय करतो हे मला माहीत नव्हते! शिल्पा शेट्टीने पोलिसांकडे नोंदवला जबाब

मी माझ्या कामात प्रचंड व्यस्त होते. त्यामुळे माझा पती राज पुंद्रा काय करतो याबद्दल आपल्याला काहीच माहीत नव्हते, असा जबाब अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने मुंबई पोलिसांकडे नोंदवला आहे.

पॉर्नोग्राफी प्रकरणी उद्योजक राज कुंद्रा 19 जुलैपासून पोलिसांच्या ताब्यात आहे. या प्रकरणी राजसह इतर आरोपीविरोधात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने बुधवारी दीड हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. हे आरोपपत्र एक्स्पेनेड न्यायालयात सादर करण्यात आले आहेत. त्यात शर्लिन चोप्रा, शिल्पा शेट्टीसह 43 जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.

शिल्पाचा जबाब त्या आरोपपत्रात आहे. तसेच हॉटशॉट किंवा बॉलीफेम या अॅप्सविषयी आपल्याला कोणतीही माहिती नव्हती, असेही शिल्पाने आपल्या जबाबात म्हटले आहे.

गुगलने ब्लॉक केला होता अॅप

पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार गुगल प्लेस्टोअर आणि अॅपलवरुन हॉटशॉट्श हे अॅप ब्लॉक करण्यात आल्याची माहिती पुढे येत आहे. त्यानंतर राज याने नव्याने अॅप तयार केल्याची माहिती पुढे आली आहे. बॉलीफेम असे या अॅपचे नाव होते. दरम्यान, या संपूर्ण अॅपसाठी राज कुंद्रा याने 9 ते 10 कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याची माहिती तपासात उघड झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या