पाकिस्तानात कार्यक्रम करण्यापासून मला रोखून दाखवा! काँग्रेसमध्ये गेलेल्या अभिनेत्रीने दिलं आव्हान

5732

बॉलिवूडचा गायक मिका सिंग याने काही काळापूर्वी पाकिस्तानमध्ये गाण्यांचा एक लाईव्ह कार्यक्रम केला होता. पण, या कार्यक्रमानंतर त्याच्यावर सर्वत्र कडाडून टीका झाली. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज या संघटनेनेही त्याच्यावर बंदी घातली होती, पण मिका सिंग याने माफी मागितल्यानंतर बंदी हटवण्यात आली. हे प्रकरण इथेच थांबलं नसून आता एका अभिनेत्रीने त्याचं समर्थन केलं आहे. मी पाकिस्तानात जाऊन शो करणारच, शक्य असेल तर रोखून दाखवा, असं आव्हानही तिने दिलं आहे.

shilpa9

ही अभिनेत्री म्हणजे बिग बॉस हिंदीच्या 11 व्या पर्वाची विजेती आणि काही काळापूर्वी काँग्रेसमध्ये दाखल झालेली अभिनेत्री शिल्पा शिंदे. एनडीटीव्ही इंडिया या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, शिल्पाने मिकाचं समर्थन केलं आहे. ती म्हणाली की, जरी मिकाने या प्रकरणी माफी मागितली असली तरी मी सांगू इच्छिते की असा कोणताही कायदा नाही जो लोकांना त्यांचं काम करण्यापासून रोखतो. मिका पुन्हा पाकिस्तानात जाऊन काम करणार की नाही ते नाही माहीत, पण मी पाकिस्तानात जाऊन एखादा शो करण्याचा विचार करतेय आणि हिंमत असेल तर मला हा शो करण्यापासून रोखून दाखवा, असं जाहीर आव्हान शिल्पाने दिलं आहे.

मिकाची या घटनेत कोणतीही चूक नसताना त्याने माफी मागितली. त्यामुळे त्याच्यावर किती ताण असेल याची संपूर्ण कल्पना मला आहे. अशा प्रकारच्या संघटनांना कोणावरही बंदी आणण्याचा अधिकार कोणी दिला, असा सवालही तिने केला आहे. कोणीही कितीही बंदी आणण्याचा प्रयत्न केला तरी एखाद्याची कारकिर्द ते संपवू शकत नाहीत, असंही शिल्पा यावेळी म्हणाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या