मिंधे गटाला धक्का, कल्याणच्या जिल्हाप्रमुखांचा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

मिंधे गटाला कल्याणमध्ये धक्का बसला आहे. कल्याणचे जिल्हाप्रमुख साईनाथ तरे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश घेतला आहे. तसेच मनसेचे गणेश नाईक यांनीही शिवसेनेत जाहीर प्रवेश घेतला आहे.

तसेच माजी मंत्रालयीन सहसचिव सिध्दार्थ खरात यांनीही आज मातोश्रीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले.