शिंदे गटाच्या आमदार लता सोनवणे यांच्या गाडीला अपघात, डंपरने दिली धडक

शिंदे गटाच्या आमदार लता सोनवणे (Lata Sonawane) यांच्या गाडीला अपघात झाला. त्यांच्या गाडीला डंपरने उडवल्याची माहिती मिळतेय. जळगाव तालुक्यातील चोपडा-जळगाव रस्त्यावर करंज गावा जवळ शनिवारी रात्री साडे आठच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात लता सोनवणे यांच्यासह त्यांचे पती चंद्रकांत सोनवणे, चालक आणि अगरक्षकाला किरकोळ दुखापत झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लता सोनवणे यांच्या हस्ते कुरवेल ते तावसा या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. हा कार्यक्रम आटोपल्यानंतर त्या पतीसह इनेव्हा (क्र. एमएच 19, बीयू 999) या गाडीने जळगावकडे निघाल्या होत्या. याच दरम्यान चोपडा-जळगाव रस्त्यावर करंज गावा जवळ डंपरने (क्रम. एमएच 19, झेड 6245) त्यांच्या गाडीचा धडक दिली. अपघातानंतर डंपर चालक गाडी सोडून फरार झाला.

शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या गाडीला भीषण अपघात, कशेडी घाटात टँकरने दिली धडक

दरम्यान, डंपरने धडक दिल्याने गाडीचा पुढील भाग चेपला गेला. या अपघातात गाडीचे नुकसान झाले असून गाडीतील चारही जणांना किरकोळ जखमा झाल्या. अपघातानंतर जखमींना पोलीस स्कॉडच्या वाहनातून जळगावला नेण्यात आले. येथे प्राथमिक उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले.

आमदार शहाजीबापू पाटलांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात; एकाचा जागीच मृत्यू, एक गंभीर