शिंजो आबे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

जपानचे पंतप्रधान शिंजो अबे यांनी केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या पार्थिवावर टोकियो येथील निप्पॉन बुडोकान कम्युनिटी सेंटर येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्यासह जगभरातील दिग्गज नेते, प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. जपानच्या नारा शहरातील प्रचारसभेदरम्यान आबे यांची 8 जुलैला गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. यानंतर त्यांच्या पार्थिवावर 15 जुलैला अंत्यसंस्कार करण्यात आले होते. मंगळवारी होणारा शासकीय अंत्यसंस्कार प्रतिकात्मक होता.