अपहरण झालेली पाच महिन्याची मुलगी 24 तासात सापडली; आरोपी फरार

625

शिर्डी साईबाबा संस्थान प्रसादलया समोरून अपहरण करूण पळवून नेलेली पाच महीन्याची मुलगी 24 तासात सापडली. मात्र आरोपी फरार झाला. मंगळवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास एक इसम लहान मुलीला घेऊन जाताना सिसीटीव्हीमध्ये दिसून आला. सदर घटने प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात अपहरणाची फिर्याद दाखल करून पोलीसांनी तपास सुरू केला होता. बुधवारी शिर्डी लगत असलेल्या निमगाव शिवारात एक वृध्द महिला शेतात गवत कापत असताना तिला लहान मुलीच्या रडन्याचा आवाज ऐकू आला. महिलेने सदर माहीती परीसरातील नागरीकांना दिली. निमगावचे सरपंच कैलास कातोरे यांनी याबबतची माहीती शिर्डी पोलीसांना दिली असता तातडीने पोलीसांनी घटनास्थळी जाऊन मुलीला ताब्यात घेत उपचारासाठी दवाखान्यात नेले. ही पाच महिन्याची मुलगी सुरक्षीत आसल्याचे पोलीसांनी सांगीतले. मुलीला पळवून नेणाऱ्या आरोपीने तिला शेतात टाकून तो फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मुलीला तिच्या आईच्या ताब्यात देन्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या