शिर्डी – गाडीला साईड देण्यावरून वाद, तरुणाचा निर्घृण खून

1497

शिर्डी परिसरातील पिंपळवाडी रोड शिवारात बुधवारी रात्री किरकोळ कारणावरुन तरुणाचा खून करण्यात आला. याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका तरुणास ताब्यात घेण्यात आले आहे.

शिर्डी शहरातील भिमनगर परिसरात राहणारा विठ्ठल साहेबराव मोरे हा तरुण एमएच-17, एए 674 ही गाडी रस्त्यावर आडवी उभी करून उभा होता. याचवेळी श्रीकांत राजू शिंदे हा त्याच्याकडील एमएच-17, बीके 1100 इनोव्हा कार घेऊन आला. यावेळी साईड देण्याच्या कारणावरुन या दोघांमध्ये बाचाबाची झाली. बाचाबाची पर्यावसन हाणामारीत झाले. या बाचाबाचीनंतर श्रीकांत याने विठ्ठल मोरे याचा खून केला.

याप्रकरणी मयताचा मामेभाऊ कृष्णा शेजवळ याने शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी श्रीकांत राजू शिंदे याचेविरुध्द भादंवि कलम 302, अ. जा. प्रतिबंधक कायदा कलम 3(1) (आर) (एस) 3 (2) (5) अन्वये गुन्हा दाखल केला. घटना घडल्यानंतर घटनास्थळी अप्पर पोलीस उपअधिक्षक डॉ. दिपाली काळे, पोलीस उपअधिक्षक सोमनाथ वाकचौरे पोलीस निरीक्षक गोकूळ औताडे, पोलीस निरीक्षक नितीनकुमार गोकावे यांनी भेट दिली.

आपली प्रतिक्रिया द्या