शिर्डीत २ लाख ७० हजाराची बेहिशेबी रक्कम पकडली

763

शिर्डी विधानसभा निवडणूक आचारसंहिता काळात शिर्डीतील नाकाबंदीत पोलिसांनी एका गाडीतून बेहिशेबी २ लाख ७० हजाराची रक्कम पकडली.

शिर्डी येथे आर. बी. आय. चौकात शिर्डी पोलीस दुपारी नाकाबंदी व वाहन तपासणी करत असतांना महिंद्रा कंपनीची एम एच १७ बी डी २३९० या गाडीची तपासणी केली असता गाडीतील राहुरी येथील मनोज बाफना यांच्या बॅगेत २ लाख ७० हजाराची रोख रक्कम आढळून आली. त्याबाबत त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्याकडून समाधान कारक माहीती न मिळाल्याने सदर रक्कम शिर्डी पोलिसांनी फ्लाईंग स्कॉड मार्फत राहाता तहसिलदार यांच्याकडे जमा केली.  निवडणूक निर्णय अधिकारी गोवींद शिंदे यांनी सदर रक्कम उप कोषागार कार्यालय कोपरगाव कार्यालयात जमा केल्याची माहीती दिली. सदर रक्कम राहुरी येथील एका व्यापाऱ्याची असल्याचे समजते.

 

आपली प्रतिक्रिया द्या