३१ डिसेंबरला साईबाबांचे मंदीर रात्रभर खुलं राहणार

58

 सामना ऑनलाईन। शिर्डी

लाईक करा, ट्विट करा

नवीन वर्षाचं स्वागत साईबाबांच्या दर्शनाने करणाऱ्यांसाठी खुषखबर आहे. यंदाही साईभक्तांसाठी ३१ डिसेंबरला रात्रभर साईमंदीर भक्तांसाठी खुलं ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ख्रिसमसला साईबाबांच्या मंदीरात प्रचंड गर्दी झाली होती. २४ आणि २५ डिसेंबरला दिड लाख भाविकांनी साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. भक्तांना तासनतास रांगेत उभं रहावं लागू नये म्हणून शिर्डी साईसंस्थानाने तिरूपती मंदिराप्रमाणे ठरलेल्या वेळेनुसार दर्शनाची पद्धत सुरू करण्याचा निर्णय झाला. ही पद्धत सगळ्यात पहिल्यांता ख्रिसमसमध्ये वापरण्याचा निर्णय घेण्यात आला.

या नव्या पद्धतीवर काही भक्तांनी नाराजी व्यक्त केला आहे. दिलेल्या वेळेवर दर्शन घेण्यासाठी रांग लावावीच लागत असल्याचं भक्तांचं म्हणणं आहे. पूर्वीदेखील ३ तास रांगेत जात होते, आताही रांगेत उबं रहावं लागतंय तर मग नव्या पद्धतीचा फायदा काय असा प्रश्न काही भक्तांना पडला आहे. याबाबत साईसंस्थानाच्या पदाधिकाऱ्यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं की ही व्यवस्था नवीन आहे, आणि या व्यवस्थेत काही त्रुटी असल्यास त्या दूर केल्या जातील.

आपली प्रतिक्रिया द्या