पालख्या घेऊन येऊ नका, मंदिरात गर्दी टाळा; शिर्डी साईबाबा मंदिर संस्थानाचे आवाहन

2997
shirdi-trust

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर रामनवमी निमित्त शिर्डीत पायी पालखी आणणाऱ्यांनी यावर्षी येणे टाळावे तसेच शिर्डीत मंदिर परीसरात गर्दिही टाळावी, असे आवाहन साईबाबा संस्थान कार्यकारी अधिकारी अरूण डोंगरे यांनी केले आहे.

कोरोनो मुळे शिर्डीत मोठी खबरदारी घेतली जात असून काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या रामनवमी उत्सहावर याचे सावट पसरू लागले आहे. या उत्सव काळात होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन त्यासाठी संस्थान प्रशासन प्रयत्नाला लागले असून येण्याचे आवाहन केले असून प्रत्येक पालखी प्रमुखाला संस्थानच्या वतीने पत्र पाठविण्यात आले आहे. तसेच संस्थानच्या वतीने मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही विनंती करण्यात आली असून या पालख्यांच्या प्रतिनिधीची बैठक घेऊन त्यांना सुचना करव्यात असे संस्थानच्या वतीने कार्यकारी अधिकारी डोंगरे यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले.

गर्दी घटली
रविवारी होणारी मोठी गर्दी घटली असून अत्यल्प गर्दीमुळे दर्शन रांगा ओस पडलेल्या दिसून आल्या. यामुळे शिर्डीच्या अर्थकारणाला कोट्यवधीचा फटका बसत आहे. दिवसाला दोन कोटीहून अधिकची होणारी ऊलाढाल चाळीस पन्नास लाखावर खाली आली आहे. हॉटेल ,रेस्टॉरंट, फुलं, हार, प्रसाद, लॉज या व्यवसायांवर मोठा परिणाम दिसत असून एस टी बस, खाजगी बसेस , रेल्वे व विमान प्रवाशांमधेही मोठी घट झाली असून साई संस्थानच्या येणाऱ्या दानातही निम्म्याने घट झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या