शिरोळमध्ये सात वर्षांच्या मुलीवर अत्याचार, गावात तणावपूर्व शांतता

शिरोळ तालुक्यातील दत्तवाड येथे सात वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली असून संशयित आरोपी हा अल्पवयीन असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान या घटनेच्या निषेदार्थ गाव बंद ठेवण्यात आले असून पीडित मुलीची तब्बेत चिंताजनक असल्याचे बोलले जात आहे.

येथील ग्रामीण रुग्णालय जवळ राहणारी सात वर्षीय बालिकेवर घरा पाठिमागे राहणाऱ्या चौदा वर्षीय अल्पवयीन मुलाने बुधवार सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान अनैसर्गिक कृत्य केले, याचा त्रास मुलीला होऊ लागल्याने ग्रामीण रुग्णालयात नेल्यानंतर तेथील डॉक्टर पाटील यांनी तपासणी केली. मुलीला पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील प्रमिला राजे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून संशयित आरोपीला कुरुंदवाड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरवडे यांनी ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, इचलकरंजीचे पोलीस उपअधीक्षक महामुनी अतिरिक्त अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. संशयित मुलाच्या घराची पाहणी करून ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली. पत्रकारांशी बोलताना महामुनी यांनी सांगितले की, याबाबत ठोस पुरावे गोळा करून आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. याबाबत नागरिकांनी संयम राखून गावात शांतता राखावी असे आव्हानही त्यांनी केले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे

आपली प्रतिक्रिया द्या