वयोवृद्ध वडिलांना खांद्यावर घेऊन 60 वर्षाच्या व्यक्तीने रुग्णालयासाठी केली 8 किमीची पायपीट

1850

एकीकडे आई-वडिलांना वृद्धाश्रमामध्ये ठेवून आपली जबाबदारी झटकणाऱ्यांची संख्या वाढत असताना दुसरीकडे 85 वर्षांच्या वृद्ध वडिलांना 60 वर्षांच्या मुलाने खांद्यावर घेऊन चार किमी चालत जात रुग्णालयात दाखल केले. नवनाथ असे त्या व्यक्तीचे नाव असून सध्या शिरूरमध्ये या श्रावण बाळाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. नवनाथ स्वत: 60 वर्षांचे असल्याने ही पायपीट त्यांच्यासाठी सोप्पी नव्हती. मात्र वडिलांसाठी त्यांनी कसलाही विचार न करता या भयंकर परिस्थितीत पायपटी करत रुग्णालय गाठले.

लॉकडाऊन असल्यामुळे वाहतुकीच्या अनेक अडचणींचा सामना ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना करावा लागत आहे. शिरूरपासून चार कि.मी.अंतरावर असणाऱ्या झापेवाडी येथून शिरूरकडे येण्यासाठी वाहन नसल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. खासगी वाहतुकही सध्या बंद आहे. अशा परिस्थितीमध्ये रावसाहेब हे 85 वर्ष वयाचे वृद्ध आजारी पडले. त्यांना रूग्णालयामध्ये कसे घेऊन जावे हा प्रश्न त्यांचा 60 वर्षीय मुलगा नवनाथ यांना पडला. अखेर गाडीघोड्याची वाट न पाहता नवनाथ यांनी वृद्ध वडिलांना खांद्यावर घेऊन आपल्या हातात काठी घेत शिरूरकडे पायी जाण्याचा निर्णय घेतला. तब्बल चार किमी पायपीट केल्यानंतर त्यांनी रूग्णालय गाठले. डॉ.रमणलाल बडजाते यांनी रावसाहेब यांची तपासणी केली. सलाईनसह औषधोपचार करून त्यांना गावाकडे परतण्यास सांगितले. त्यानंतर नवनाथ यांनी पुन्हा वडिलांना खांद्यावर घेऊन घर गाठले.

आपली प्रतिक्रिया द्या