शिरूर तालुक्यातील गहिनीनाथांच्या मंदिरातील दानपेटी फोडली, 29 हजारांचा ऐवज चोरीला

शिरूर तालुक्यातील आण्णापूर गावातील गहिनीनाथाच्या मंदिराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी दानपेटी फोडून 29 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.  शिरूर पोलीस ठाण्यामध्ये  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 25 ते 26 नोव्हेंबरच्या रात्री ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 25 नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास मंदिर बंद करण्यात आले होते त्यानंतर पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास पोलीस पाटील जाधव यांना खानापूर गावातील गहिनीनाथ मंदिरात चोरी झाल्याचे फोन आला.

त्यानंतर पाटील यांनी मंदिरात जाऊन पाहणी केली. तेव्हा चोरट्यांनी मंदिराचा दरवाजाचे कुलूप तोडून आत मंदिरातील इन्व्हर्टर, बॅटरी, माइक, साऊंड आणि दानपेटीतील अंदाजे पाच हजार रुपये असा 29 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे आढळून आले. शिरूर पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या