शिरूरच्या बेट भागातील शरदवाडीच्या 5 सुपूत्रांचे कोविड योद्धे म्हणून काम उल्लेखनीय

जगभर थैमान घातलेल्या कोरोना माहामारीच्या पार्श्वभूमीवर या रोगाचा मुकाबला करण्याचे काम विविध स्तरातून सुरु आहे. संपूर्ण जग कोरोनाशी लढा देत आहे. यामध्ये प्रामुख्याने पोलीस यंत्रणेतील सर्व अधिकारी, कर्मचारी, सफाई कामगार, शिक्षक, शासकीय यंत्रणेतील इतर घटक हे सर्वजण देशसेवा म्हणून आपले कर्तव्य अहोरात्र प्रामाणिकपणे पार पाडत आहेत.

शिरूर तालुक्याच्या बेट भागातील शरदवाडी येथील विविध क्षेत्रात कार्यरत असणारे 5 सुपुत्र जीवाची बाजी लावून सिंधुदुर्ग, पुणे येथे पोलीस व आरोग्य यंत्रणेत आपले देशसेवेचे कर्तव्य कोरोना महामारीच्या काळात प्रामाणिकपणे आणि सचोटीने निभावत आहेत. पुणे येथील खडकी पोलीस स्टेशन येथे काम करणारे रामदास यशवंत मेरगळ हे आपले कर्तव्य दिवस रात्र प्रामाणिक पणे पार पाडत आहेत.डाँ दिनकर विष्णू सरोदे श्रीरोगतज्ञ सिंधुदुर्ग येथे उत्कृष्ट काम करत आहेत. भास्कर दत्तात्रय गांजे हे पिंपरी चिंचवड येथे पोलीस दलात असून आपले काम प्रामाणिकपणे पार पाडत आहेत.

प्राजक्ता कोंडीभाऊ पोकळे ह्या पुणे पोलीस मुख्यालय येथे काम करत आहेत. पोपट काशिनाथ गांजे हे मंचर येथील वडगाव काशिंबे येथे आरोग्य सेवक म्हणून चोख काम पार पाडत आहेत. हे 5 ही जण कोरोना विरुद्धच्या या लढाईत कुटुंबापासून गेल्या कित्येक दिवसापासून दूर राहून जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत आहेत. कोरोनाच्या या भयावह काळात आपले कर्तव्य सातत्याने पार पाडीत असलेल्या शरदवाडीच्या या 5 भूमिपुत्रांचा ग्रामस्थांना समर्थ अभिमान असून शरदवाडी ग्रामस्थ, पुण्याचे उपजिल्हाधिकारी रामदास जगताप, घोडगंगा कारखान्याचे संचालक राजेंद्र गावडे व जांबूतचा माजी उपसरपंच गणेश सरोदे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या