मस्तकावर अवतरले ‘शिवछत्रपती’, शिवजयंती सोहळ्याचा पंढरीत अनोखा फिवर

511

बुधवार 19 फेब्रुवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या शिवजयंती सोहळ्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. याच पार्श्वभूमीवर पंढरपूरमधील शिवप्रेमींनी आपल्या डोक्यावर छत्रपती शिवरायांची प्रतिमा कोरुन त्यांना अनोखे अभिवादन केले आहे.

शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहर भगवंमय झालं असून शहराच्या मुख्य चौकातील छत्रपतीच्या अश्वारुढ पुतळ्याला भव्य अशी सजावट करण्यात आली आहे. शासकीय संस्था, सार्वजनिक संस्था आणि सार्वजनिक मंडळांनी जयंती उत्सवाची जय्यत तयारी केली आहे. शहरभर भगवे झेंडे डोलाने फडकताना दिसत आहेत. जयंती उत्सवाच्या निमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याशिवाय व्याख्यान, पोवाडे आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

शिवजयंतीनिमित्त शिवभक्त तरुणांनी छत्रपती शिवरायांची प्रतिकृती आपल्या डोक्यातील केसांमध्ये कोरुन घेतली आहे. प्रतिकृती बरोबर ‘राजे, जय भवानी जय शिवाजी, जय जिजाऊ आदी वाक्य केसांमध्ये कोरलेली दिसत आहेत. केसांमधील या कलाकृतीत पंढरपूरचे नाभिक कलाकार तुकाराम चव्हाण हे गेल्या आठवडाभरापासून याच कामात गुंतले असून तरुणांमध्ये हा फिवर मोठ्या प्रमाणात असल्याचे त्यांनी ‘सामना’शी बोलताना सांगितले.

shivchatrapati-2

आपली प्रतिक्रिया द्या