छत्रपती शिवरायांवर तीन सिनेमे; रितेशने केली घोषणा

704

शिवजयंतीचे औचित्य साधून अभिनेता रितेश देशमुखने छत्रपती शिवाजी महाराजांवरील तीन चित्रपटांची घोषणा केली आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेती टीम या सिनेमात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. नागराज मंजुळे यांचे दिग्दर्शन आणि अजय-अतुल यांचे संगीत या ‘शिवत्रयी’ सीरिजला लाभणार  आहे. ‘शिवाजी’, ‘राजा शिवाजी’ आणि ‘छत्रपती शिवाजी’ असे तीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यातील पहिला सिनेमा पुढच्या वर्षी येईल. या चित्रपटात मुख्य भूमिका कोण साकारणार हे अद्याप गुलदस्त्यात असले तरी खुद्द रितेश हे शिवधनुष्य पेलण्याची शक्यता आहे. अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी-अभिनेत्री जेनेलिया देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर चित्रपट निर्मिती करणार असल्याची चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून होती. अखेर याची आता अधिकृत घोषणा रितेशने सोशल मिडियावरून केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या