आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत 100 डॉक्टरांचे पथक कोल्हापूर, सांगलीस रवाना

790

सामना ऑनलाईन । ठाणे

शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पूरग्रस्त सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील बांधवांसाठी सलग 5 दिवस महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाणे येथून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात महाआरोग्य शिबीरासाठी शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 100 डॉक्टरांचे पथक रवाना झाले.

महाआरोग्य शिबीराच्या माध्यमातून सलग 5 दिवस हजारो नागरिकांची वैद्यकीय तपासणी, रक्त तपासणी आणि औषध वाटप करण्यात येणार आहे. तसेच सर्व डॉक्टरांनी पूरग्रस्त भागातील नागरिकांसाठी सॅनेटरी नॅपकीन, टॉवेल, अंतर्वस्त्र, पेस्ट, बिस्किट व इतर जीवनावश्यक वस्तू सोबत घेतल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या