सिंधुदुर्ग : आदित्य ठाकरेंनी घेतला पूरग्रस्त भागाचा आढावा; जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

1645

शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी सोमवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील पूरग्रस्त भागाचा आढावा घेतला. आदित्य ठाकरे यांनी बांदा, असनिये, झोळंबे आणि माणेरी या पूरग्रस्त भागामध्ये जावून परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी पुरामुळे नुकसान झालेल्या नागरिकांशी आणि व्यापाऱ्यांशी संवाद साधून त्यांना लवकरात लवकर मदत करण्याचे आश्वासन दिले.

आदित्य ठाकरे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील माणेरी या पूरग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी पूरग्रस्तांना भांडी, डाळ, तांदूळ, चटई, चादर, साखर आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. तसेच पुरामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना धनादेशाचे वितरण करण्यात आले. पुरामुळे खचून न जाता काही गरज लागल्यास शिवसेनेची आठवण काढण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी शिवसेना खासदार विनायक राऊत, पालकमंत्री दिपक केसरकर आणि सचिन अहिर उपस्थित होते.

माणेरीसह दोडामार्ग तालुक्यातील झोळंबे या पूरग्रस्त गावाची आदित्य ठाकरे यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी पुरामुळे घरांचे नुकसान झाल्याने त्यांचे पुनर्वसन करण्याबाबत तज्ञांचे मत विचारात घेऊन लवकरात लवकर निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले.

यासह आदित्य ठाकरे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील बांदा, असनिये या पूरग्रस्त भागाचा आढावा घेतला आणि गावाची पाहणी केली. यावेळी त्यांनी पुरामुळे नुकसान झालेल्या नागरिकांशी आणि व्यापाऱ्यांशी संवाद साधून त्यांना लवकरात लवकर मदत करण्याचे आश्वासन दिले. तसेच डोंगर कोसळल्यामुळे शेतीचे आणि घरांचे नुकसान झालेल्या ग्रामस्थांची विचारपूस केली.

आपली प्रतिक्रिया द्या