शेतकऱ्यांना दसऱ्यापूर्वी कर्जमुक्त करा, शिवसेनेची मागणी

25

सामना प्रतिनिधी । लातूर

राज्य सरकारने घेतलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या घोषणेला तीन महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे. मात्र अद्यापही शेतकरी कर्जमुक्त झालेला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी दसऱ्यापूर्वी कर्जमुक्त करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन शिवसेनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, कर्जमाफीच्या निर्णयानंतरही अद्यापपर्यंत शेतकरी कर्जमुक्त झालेला नाही. कर्जमाफीनंतरही शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरू आहे. कर्जमाफीचा फायदा अद्यापही शेतकऱ्यांना झालेला नाही. शासनाकडून मात्र आकडयांचे आणि तारखांचे खेळ सुरू आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दसऱ्यापूर्वी कर्जमुक्त करण्यात यावे अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या