शिवतीर्थावर उसळला जनसागर! छगन भुजबळ, जयंत पाटलांची शिवसेनाप्रमुखांना मानवंदना

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज 17 नोव्हेंबर रोजी महानिर्वाण दिन. मराठी मनामनात अस्मितेची मशाल प्रज्वलित करणाऱ्या आणि अवघ्या देशात हिंदुत्वाचा वन्ही चेतवणाऱ्या आपल्या लाडक्या साहेबांना मानवंदना देण्यासाठी लाखो शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमींचा अलोट जनसागर शिवतीर्थावर स्मृतिस्थळी उसळला आहे.

सकाळपासून शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमींचा तांडा शिवतीर्थावर दाखल झाला. शिवसैनिकांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिवतीर्थावर उपस्थित राहून शिवसेनाप्रमुखांना मानवंदना वाहिली. यावेळी छगन भुजबळ यांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला.

आपली प्रतिक्रिया द्या