शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेतर्फे दिव्यांगांसाठी ‘तान्हाजी’ चित्रपटाचे स्क्रिनिंग

1199

हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त चंद्रपूर जिल्हा शिवसेनेने दिव्यांग व अनाथालयातील मुलांना तान्हाजी मालुसरे यांच्या विरगाथेची व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वीर इतिहासाची माहिती मिळावी या माध्यमातून ‘तान्हाजी – द अनसंग वॉरियर’ हा चित्रपट दाखविण्यात आला. शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी शहरातील अनाथालय व महिलांच्या दिव्यांग संस्थेतून तब्बल 80 मुलांना व महिलांना हा चित्रपट दाखविला.

जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी आम्हा दिव्यांग व अनाथ बालकांना आज चित्रपट गृहात आणले व आम्हा सर्वांना हा चित्रपट दाखविला त्या बद्दल आम्ही सर्व त्यांचे आभार मानत आहो, कारण आम्हा दिव्यांग व अनाथांबद्दल कुणी या सामाजिक दृष्टिकोणाने बघत नाही. आतापर्यंत आम्ही साधा चित्रपट गृह बघितला नव्हता, परंतु शिवसेना जिल्हाप्रमुखांनी आम्हाला शिवसेनेच्या माध्यमातून ही संधी उपलब्ध करून दिली, अशी भावनिक प्रतिक्रिया ज्ञानाचर्य अपंग बहुद्देशीय संस्थेच्या संचालिका यांनी व्यक्त केली. आयोजित उपक्रमात युवा सेना समनव्यक निलेश बेलखेडे, शिवसेना शहरप्रमुख प्रमोद पाटील व शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या